Agriculture Input center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Sale Center : पंधरा कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

Licenses Suspended : सातारा जिल्ह्यात एकूण २७७४ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या १५ विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात एकूण २७७४ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या १५ विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. यात बियाणे चार, खते विक्रेते सहा व कीटकनाशक विक्रेत्यांचे पाच केंद्रांचा समावेश आहे, तसेच पाच केंद्रांची परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे.

यामध्ये सातारा तालुक्यातील दोन आणि पाटण तालुक्यातील तीन केंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

सध्या कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीचे सत्र सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याबाबतच्या तक्रारी येत असल्याने कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये युरिया खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्यप्रकारे बिले न देणे, खतांची जादा दराने विक्री करणे आदी बाबी तपासणीत उघड झाल्या आहेत.

शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना खते आणि बियाणे योग्य किमतीत मिळावीत, यासाठी कृषी विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी एकूण १२ भरारी पथके तयार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके खते, बियाणे व कीटकनाशके दुकानांची अचानक तपासणी करत आहेत.

प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या भरारी पथकामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग, वजन मापे निरीक्षक यांचे प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत या पथकांनी २७७४ विक्री केंद्राची तपासणी केली आहे.

यामध्ये दोषी आढळलेचे परवाने निलंबित केले आहेत. यात चार बियाणे विक्री केंद्रे, खते विक्रेते सहा व कीटकनाशक विक्रेत्यांचे पाच केंद्रांचा समावेश आहे. पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निविष्ठाबाबत तक्रार असल्यास नोंदवही ठेवण्यात आली आहे. व्हॉट्‍स‌ॲप नंबर ९८२२४४६६५५ वर तक्रार नोंदवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT