Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Shop License Cancelled : सुकळी येथील रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द

Shopkeeper Penalty : धान्याचा अपहार करणाऱ्या दुकानदारास दोन लाख ६२ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्याने रास्त भाव दुकानदारांत खळबळ उडाली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : तालुक्यातील सुकळी (ज.) येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न वाटप करता धान्याचा अपहार करणाऱ्या दुकानदारास दोन लाख ६२ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी धान्य अपहार केल्याप्रकरणी पुरवठा अधिकारी यांनी आदेश दिल्याने रास्त भाव दुकानदारांत खळबळ उडाली आहे.

सुकळी (ज.) येथील रास्त भाव दुकानदार एस. डी. वानखेडे यांच्या रास्त भाव धान्य दुकानाच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने पुरवठा निरीक्षक, उमरखेड यांनी दुकानात शिधापत्रिकाधारक यांची चौकशी केली होती. त्यात तब्बल ४९ शिधापत्रिका धारकांचे बयाणही नोंदविण्यात आले होते.

त्यात धान्य साठ्याच्या चौकशीमध्ये फार मोठी तफावत असल्याने रास्त भाव दुकानात गहू, तांदूळ कमी आढळून आल्याने तसेच रवा, मैदा, पोहा, पामतेल, चणाडाळ, साखर इत्यादी धान्य तपासणीदरम्यान कमी आढळून आल्याने बाजारभावप्रमाणे ही रक्कम शासन जमा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी दिले आहे.

अधिनियम १९७५ व त्या अटी व शर्थीचे उल्लंघन केल्याने त्यांच्याकडून प्राधिकरण पत्राचे शंभर टक्के एवढी रक्कम दंड म्हणून प्राधिकारी पत्र रद्द करण्याचे आदेश पारित करण्यात आले असल्याने तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सुकळी (ज.) येथील रास्त भाव दुकानदार एस. डी. वानखेडे यांनी केलेली धान्याची अपहार रक्कम जोपर्यंत जमा करणार नाही, तोपर्यंत लोकशाही मार्गाने माझा लढा चालू राहील, अशी प्रतिक्रिया सुकळी येथील उपसरपंच शिवाजी रावते यांनी दिली आहे.

तपासणी वेळी कमी आढळून आलेले धान्य

गहू २१.१८ क्विंटल इकॉनॉमिक कॉस्टनुसार ५७,२५० रुपये व तांदूळ ४७.४३ क्विंटल इकॉनॉमी दराप्रमाणे १,८५, ८३३ रुपये, लाभार्थ्यांना कमी वाटप केलेला गहू ०.७० क्विंटल व तांदूळ १.५६ क्विंटल तसेच आनंदाचा शिधा यामधील रवा १६.५०० किलो, मैदा ११.५०० किलो, पोहा ४३ किलो, पामतेल ८६ किलो, चणाडाळ ७.५०० किलो यांची एकत्रित किंमत २,६५,७५३ रुपयांचा अपहार केल्याचे पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार कमी असल्याचे दिसून आले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT