Ration Shops : रेशन दुकानात आता ‘आय स्कॅनर’

Eye Scanner Gun : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशिनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आता ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशिनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आता ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे.

त्यामुळे व्यक्तीचे डोळे स्कॅन करून खात्री केली जाईल व त्या व्यक्तीला धान्य दिले जाणार आहे. जळगाव शहरातील काही दुकानांत प्रायोगिक तत्त्वावर उपयोग केला जात असून, लवकरच राज्यातील सर्वच दुकानांत आय स्कॅनर गन दिली जाणार आहे.

Ration Shop
Ration Holders : सत्तावीस हजार रेशनधारक कुटुंबांसाठी ‘गुडन्यूज’

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉज यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव धानर दुकानात ई-पॉज यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते.

व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिलांना ही समस्या जाणवते. त्यामुळे ई-पॉज यंत्रावर त्यांचे ठसे उमटत नाहीत. मग, त्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठेसे देऊन धान्य घ्यावे लागते. संबंधित व्यक्तीला धान्य दुकानदार ओळखत असूनही ई-पॉज यंत्रावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना धान्य देता येत नाहीत.

Ration Shop
Free Ration Scheme : मोफत गहू, तांदळासोबत मिळणार बाजरी ; युपी सरकारचा निर्णय

यामुळे नाहक वादाचे प्रसंग उद्‌भवतात. यासाठी आता शासनाने ‘आय स्कॅनर गन’चा पर्याय आणला आहे. यामध्ये प्रत्येक दुकानात आप ‘आय स्कॅनर गन’ दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई-पॉज यंत्रावर येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे.

यामुळे कोणत्याही व्यक्तीला धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागणार नाही. आधार कार्ड काढताना डोळ्यांचे स्कॅनिंग करून ‘आयरीज’ घेतले आहेत. त्यामुळे आय स्कॅन केल्यानंतर आधार नंबरशी त्याची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा ओळख पटते. त्यामुळे आधार कार्डसाठीचा ‘डाटा’ येथे उपयोगात येणार आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com