Kolhapur Shivaji University : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकार क्षेत्राचे अद्ययावतीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने नवे पाऊल टाकले आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाने संचालक ते सभासदांपर्यंत सर्वांना नवे बदल, तंत्रज्ञानाचे धडे देण्याचा उपक्रम राबवला आहे.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात तिन्ही जिल्ह्यांत सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, पतसंस्था, सूतगिरणी, विविध कार्यकारी संस्था, सोसायटी, दूध संस्था, आदी कार्यन्वित आहेत. त्यांना खासगी क्षेत्राशी स्पर्धा करावी लागत असून, ती दिवसागणिक वाढत आहे. अशा स्थितीत सहकार क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासह या संस्थांनी योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना बळ देण्यासाठी विद्यापीठाने गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राजन पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या केंद्राकडून आतापर्यंत एकूण २ हजार ३४० जणांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले आहे. नागरी बँकांमधील ९४० अधिकारी, ८५० कर्मचारी, २५० संचालक, १५० सभासद आणि १५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना आरबीआई, सहकार क्षेत्रातील अधिकारी, तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले आहे. जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनसमवेत सामंजस्य करार करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत". अशी माहिती पडवळ यांनी दिली.
या केंद्राने सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाची सुरुवात केली. त्यात पहिल्यांदा नागरी बँकांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर पुढे संचालक, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी (लिपिक, चतुर्थश्रेणी), सभासदांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले आहेत. सहकार कायद्यातील नव्या बदल, तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आदींबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या केंद्राने पी. जी. डिप्लोमा इन बैंकिंग अँड फायनान्स सुरू केला आहे. पण, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षात कामाची पद्धत यात 'गॅप' राहू नये. सहकारी संस्थांना 'रेडी टू युज' मनुष्यबळ मिळावे, यासाठी अभ्यासक्रम बदलाचे काम सुरू आहे. त्यासाठी बँका, संस्थांतील सात सीईओंची मदत घेतली जात असल्याचे डॉ. पडवळ यांनी सांगितले.
"आगामी वर्षात या केंद्रातर्फे विद्यापीठ संलग्नित २९९ महाविद्यालयांतील सुविधांचा वापर करुन तालुका पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. सांगली, सातारा जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मार्केटिंग, लेखाविभाग आणि मनुष्यबळ विकासाच्या अनुषंगाने संशोधन करून सहकारी संस्थांना माहिती देणार आहे. या संस्था, बँकांना त्यांच्या यापुढील वाटचालीच्यादृष्टीने धोरणात्मक नियोजन करण्यासाठी मदत केली जाणार आहे". अशी माहिती पडवळ यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.