Leopard  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : जुन्नर वनविभागात बिबट्यांच्या ‘डरकाळ्या’ वाढल्या

Leopard Attack : आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड या चार तालुक्यांत जवळपास बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून सर्वाधिक बिबटे आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत आहेत.

नवनाथ भेके

Pune News : जुन्नर वनविभागात बिबट्याच्या संख्येत वाढ झाली असून आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यांत गेल्या ४० महिन्यांत बिबट्यांमुळे १२ मनुष्यांसह १० हजार पशुधनांना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच ३३ जणांवर हल्ले झाले आहेत. वनविभागाकडून भरपाई मिळाली असली तरी बिबट्याचे संकट सरकारने वेळीच रोखणे गरजेचे आहे.

आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड या चार तालुक्यांत जवळपास बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून सर्वाधिक बिबटे आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत आहेत. हे बिबटे आता घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहचले असल्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या परिसरात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असून हेच बिबट्याचे आश्रयस्थान बनले आहे.

सध्या रात्रीचा प्रवास बिबट्यांच्या दहशतीमुळे धोकादायक बनला आहे. मंचर-घोडेगाव रस्त्यावर १० ऑगस्ट रोजी वडगाव काशिंबेग फाट्यानजीक दुचाकीला बिबट्याने धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले होते.

तसेच मागील महिन्यात आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे-जाधववाडी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकीला बिबट्याने धडक दिल्याने एका कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले होते. कळंब -लौकी रस्त्यावरही रात्रीच्या सुमारास बिबट्याने चार दुचाकी चालकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

बिबट्याकडून कुत्र्यावर लक्ष केले जात आहे. मागील महिन्यात निरगुडसर येथे चोळीच्या मळ्यात दत्तात्रय गायकवाड यांचा कुत्रा दिवसाढवळ्या बिबट्याने ओढून नेला. तसेच आठ ऑगस्ट रोजी वळती येथील मारुती भोर यांचाही कुत्रा दिवसा ढवळ्या बिबट्याने घरासमोरून ओढत नेऊन त्याला ठार मारले.

मदत मिळाली, पण जीव गेला.

एप्रिल २०२१ ते जुलै २०२४ या ४० महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांना भरपाई पोटी २ कोटी ४० लाख रुपये देण्यात आले आहे. तसेच हल्ल्यात ३३ व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांना ३९ लाख ४ हजार ११८ रुपये मदत देण्यात आली आहे.

तसेच ४० महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात १० हजार ८१ पशुधनांचा मृत्यू झाला. या पोटी ८,४८० प्रकरणे दाखल असून त्या भरपाई पोटी ९ कोटी ६१ लाख १२ हजार ५७६ रुपये देण्यात आले आहे.- अमोल सातपुते, वनविभागाचे उपसंरक्षक अधिकारी, जुन्नर

बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिबट मादींवर नसबंदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी बिबट मादीची प्रजनन क्षमता रोखण्यासाठीचा अहवाल ही राज्य शासनाकडे पाठवला आहे
- अमोल सातपुते, वनविभागाचे उपसंरक्षक अधिकारी, जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: दिवाळी उलटून गेल्यानंतरही सोयाबीन खरेदीचा घोळच

Cotton Rate: सेलू बाजार समितीत पाडव्याला कापसाला सरासरी ७१५० रुपये दर

Crop Damage: शेतात पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान

Soybean Rate: बाजारात ‘पांढऱ्या’पाठोपाठ ‘पिवळे सोने’ही काळवंडले

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’मध्ये राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT