Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : जामखेड शहराजवळ बिबट्याचा वावर

Leopard Attack : जामखेड शहर आणि परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या धास्तीने त्रस्त आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : जामखेड शहर आणि परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या धास्तीने त्रस्त आहेत. शहरापासून जवळ असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे.

त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांत भयभीत झाले आहेत. तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी लोकांनी केली आहे. जामखेड शहरालगत भुतवडा तलाव आहे. या भागात दोन दिवसांपूर्वी तीन बिबट्यांनी एका गाईचा फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

त्यापूर्वी मोहा, साकत घाट या परिसरात अनेकांना बिबट्या आढळून आला होता. सध्या या भागात रब्बीची पिके असल्याने बिबट्याला लपण्याला जागा आहे. शिवाय परिसरात डोंगर आहे. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे.

पलिकडे बीड जिल्ह्यातील अनेक भागांत बिबट्या सातत्याने दिसून येतो. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील डोंगरात मोहा, साकत घाटात अनेकांना बिबट्या दिसला. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत बसली आहे.

दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुतवडा परिसरासह खैरी मध्यम प्रकल्प, खर्डा परिसराचीही पाहणी केली. लोकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठविणार आहोत. मात्र जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात नरमाई; केळीला उठाव, कापूस दरावर दबाव, गवार तेजीत, तर ज्वारीला मागणी कायम

Ganeshotsav 2025: माटवी सजविण्याच्या खरेदीकरिता ग्राहकांची झुंबड

Alu Blight Disease: अळू पिकावरील करपा रोगाचे व्यवस्थापन

Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर

Onion Cultivation: खानदेशात कांदा पीक स्थिती बरी; पावसामुळे सिंचन बंद

SCROLL FOR NEXT