Betel Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaf : पानांची आवक घटली; दरात चांगलीच वाढ

Betel Leaf Market : पंधरा दिवसांत प्रतिडागास ६०० ते १५०० रुपये वाढ

Team Agrowon

Sangali News : वाढत्या तापमानाचा फटका पानमळ्यांना देखील बसल्याने पानांचा आकार आणि फुटवा कमी आहे. त्यामुळे राज्यासह चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णुर या भागांतूनही पानांची आवक घटली आहे.

सध्या बाजारात पानांच्या डागाला १००० ते ४५०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत पानांच्या प्रतिडागाच्या दरात ६०० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यंदाचा पान मळ्याचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू झाला. म्हैसाळ योजनेचे पाणी असल्याने पाणी टंचाई भासली नाही. या दरम्यान, पानांचे उत्पादन कमी असून चांगले दर मिळतात. मात्र, मार्च महिन्यात चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णुर या भागातील पाने राज्यातील विविध बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली.

त्यामुळे चेन्नईतील पानांची आवक वाढली. त्याचा परिणाम पानांच्या दरावर झाला होता. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीच गतवर्षीच्या तुलनेत दरात घसरण झाली होती.
पानांच्या बाजारपेठेत मार्च आणि एप्रिल महिन्यात कळी पानांच्या डागाला (एक डाग १२ हजार पानांचा) ६०० ते ३००० रुपये असा दर होता.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून विजयवाडा, चिन्नूर, कुण्णुर या भागातील पानांची आवक मंदावली आहे. सध्या बाजारात पानांची मागणी वाढली आहे. पानांची आवक कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे.

कळी पानाच्या डागाला १००० ते ४५०० रुपये दर आहे. एप्रिलच्या अखेरीनंतर पानांच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झाला आहे. परंतु जूनपासून पानांचा दर्जा, आकार आणि फुटवा चांगला मिळेल.

वाढलेल्या तापमानाचा फटका
दरम्यान, एप्रिल महिन्यात तापमानात वाढले. वाढत्या उष्णतेचा परिणाम पानमळ्यांवर झाला आहे. वेलीला अपेक्षित फुटवा मिळत नाही. त्यातच पानांचा आकार वाढत नाही. परिणामी, सध्या पानांचे अपेक्षित उत्पादन हाती येत नाही. तसेच पानांचा दर्जाही मिळत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात मागणी आहे, पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा करणे कठीण बनले आहे.

बाजारात पानांना मागणी आहे, पण मालच कमी असल्याने पुरवठा करणे जिकिरीचे बनले आहे. आवक कमी असल्याने दरात वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे, पण तापमानामुळे संकट ओढावले आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT