Gokul Milk Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Sangh : गोकुळ कर्मचारी, अधिकाऱ्यांना नेत्यांचा सज्जड दम, दांडी मारणाऱ्यावर होणार कारवाई

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत आहे.

sandeep Shirguppe

Gokul Milk Leaders : काम सोडून प्रचाराला जाऊ नका. प्रचाराचं कारण सांगून कामावर दांडी मारायची नाही. ज्यांना प्रचाराला जायचं आहे. त्याने रितसर रजा टाकावी, असा सज्जड दम जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत आहे. यातच गोकुळमध्ये सत्ता असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे लोकसभेच्या रणांगणात एकमेकांविरुद्ध आहेत. मुश्रीफ महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना आणि आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी यंत्रणा कामाला लावत आहेत. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या ताब्यात असणाऱ्या सहकारी संस्थांचा वापर केला जातो. यावर्षी मात्र अशा सहकारी संस्था आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना अलिप्त ठेवल्याचे दिसून येत आहे.

गोकुळ, जिल्हा बँक, शेतकरी संघ, बाजार समितीसह इतर सहकारी संस्थांमधील कर्मचारी मोठ्या साहेबांचे नाव सांगून पगारी दांडी मारत होते. काम करणारे कामच करत राहायचे आणि बिनकामाचे कर्मचारी साहेबांचे नाव सांगून प्रचाराचे कारण सांगत असायचे.

‘गोकुळ’मध्ये याला लगाम घातला आहे. गोकुळ असो किंवा जिल्हा बँक जे-ते पदाधिकारी आपल्या नेत्याचा प्रचार करतील. पण, कर्मचारी ऑनड्यूटी प्रचारात दिसला तर खबरदार अशा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे संस्थांचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे दिसत आहे.

‘गोकुळ’मध्ये दोन्ही बड्यानेत्यांनी प्रचाराचे नाव सांगून कामावर दांडी मारू नका. पूर्वसूचना किंवा रजा न घेता कामावर गैरहजर राहणार त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार, अशा सूचना दिल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही आपल्या दोन्ही नेत्यांचे आदेश मनावर घेऊन कामावर दांडी मारण्याचे धाडस केलेले नाही.

मोठ्या साहेबांचे नाव सांगून प्रचारात

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा इतर कोणतीही निवडणूक असो निवडणुकीचे आणि मोठ्या साहेबांचे नाव सांगून दहा-दहा ते पंधरा दिवस कामावर दांडी मारली जायची. त्या कामगाराची हजेरी संघात किंवा बँकेत असायची आणि तो कर्मचारी साहेबांचे नाव सांगून प्रचारात दंग असायचा. याला गोकुळ संघात चाप लावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT