Shetkari Sanghtana Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sanghtana : शेतकरी संघटनेचे नेते ब. ल. तामसकर यांचे निधन

मागील ४२ वर्षापासून संघटनेमध्ये काम करणारे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. मागील पंधरा दिवसांपासून ते आजारी होते.

Team Agrowon

हिंगोली‌: शेतकरी संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते ब. ल. तामसकर (वय ७४) यांचे औंढा नागनाथ येथे आज शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता निधन झाले.

मागील ४२ वर्षापासून संघटनेमध्ये काम करणारे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. मागील पंधरा दिवसांपासून ते आजारी होते.

औंढा नागनाथ येथील रहिवासी असलेले तामसकर १९८० साली शेतकरी संघटनेत दाखल झाले होते.

संघटनेच्या आंदोलनात त्यांनी नेहमीच आक्रमक भुमिका घेतली. राज्यभरात कापूस, ऊस, शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे ते अत्यंत विश्‍वासू सहकारी होते.

त्यांनी आणीबाणीच्या काळात अडीच वर्षे कारावासही भोगला. त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे सुरेगाव येथे १० डिसेंबर १९८६ रोजी झालेल्या आंदोलनापुर्वीच पोलिसांनी त्यांना स्थानबध्द केले होते.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून सध्या ते संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत होते.

शेतकरी संघटनेने काही दिवसांपुर्वीच त्यांना जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Input Dealers Strike: निविष्ठा विक्रेत्यांच्या ‘बंद’चे भवितव्य आज ठरणार

Chaondi Village Development: ‘चौंडीच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळेल’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Parrot Crop Damage Compensation: पोपटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई: उच्च न्यायालय

Agriculture Issues: साखर, कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा : फडणवीस

Farmer Death: यवतमाळमध्ये २५ दिवसांत १८ शेतकरी आत्महत्या

SCROLL FOR NEXT