Divisional Revenue Office  Agrowon
ॲग्रो विशेष

Divisional Revenue Office : लातूरला विभागीय आयुक्त कार्यालय करावे

Independent Divisional Revenue Office : पंधरा वर्षांपासून मराठवाड्यात दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल कार्यालय स्थापन करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे आयुक्तालय स्थापन करणार असल्याचे मान्य केल्यामुळे लातूरकरात संताप व्यक्त होत आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Latur News : लातूर : पंधरा वर्षांपासून मराठवाड्यात दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल कार्यालय स्थापन करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे आयुक्तालय स्थापन करणार असल्याचे मान्य केल्यामुळे लातूरकरात संताप व्यक्त होत आहे.

या विषयावर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शरद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक होऊन गुणवत्तेच्या आधारे लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. २१) सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

लातूरकरांनी पंधरा वर्षांपासून आयुक्त कार्यालयासाठी संघर्ष केला आहे, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या, लातूर, धाराशिव, बीड परिसरातील नागरिकांच्या तीव्र भावना विचारात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासाठी योग्य ठिकाण कोणते, याबाबत उमाकांत दांगट यांची समिती नेमली. या समितीने अहवाल दिलेला असून तो अहवाल खुला करावा.

या अहवालात गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथे आयुक्त कार्यालयासाठी सकारात्मक शिफारस करण्यात आली आहे. ही पार्श्वभूमी असताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद बैठकीत उमटले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना जिल्ह्यातील आमदार व खासदारांनासमवेत घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून लातूर येथेच आयुक्त कार्यालय स्थापन करावे, या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी होणाऱ्या लक्षवेधी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

या बैठकीत अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. व्यंकट बेंद्रे, अॅड. बळवंत जाधव व समितीचे निमंत्रक अॅड. उदय गवारे यांनी विचार मांडले. या वेळी अॅड. मधुकर राजमाने, अॅड. चंद्रकांत आगरकर, अॅड. प्रदीपसिंह गंगणे, अॅड. विजय जाधव, अॅड. कमलाकर सोनवणे, अॅड. मनीषा दिवे पाटील, अॅड. तृप्ती इटकरी, अॅड. नरेश कुलकर्णी, अॅड. बी. जी. कदम, अॅड. संजय पाटील, अॅड. गणेश यादव, अॅड. परवेज पठाण, अॅड. आनंद खांडेकर,

अॅड. धनराज झाडके, अॅड. भालचंद्र कवठेकर, अॅड. रमेश गायकवाड, अॅड. शेखर हविले, अॅड. बी. व्ही. सूर्यवंशी, अॅड. बालाजी पांचाळ, अॅड. गुरुलिंग काळे, अॅड. भगवान साळुंखे, अॅड. प्रदीप पाटील, अॅड. अनंत बावणे, अॅड. सुभेदार मांदळे, अॅड. एस. डी. सोनवणे, अॅड. हरी निटुरे, अॅड. राम पाटील यांच्यासर नागरिक उपस्थित होते. याबाबत कार्यवाही न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT