ॲग्रो विशेष

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, जालनासह बीड बंद

Maratha reservation case : मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले. मराठा समाज आक्रमक झाला असून ते रस्त्यावर उतरले असून आज बीड आणि जालना बंदची हाक देण्यात आली आहे.

Swapnil Shinde

Maratha aarakshan morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर उपोषण स्थळी झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे.

लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या निषेधार्थ राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनंगर आणि जालनाकडे जाणाऱ्या रस्ते बंद करण्यात आले. तर मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकात बस पेटवली. त्यानंतर विविध ठिकाणी ६ बस जाळण्यात आल्या.

तसेच आज बीड आणि जालना जिल्हा बंदची हाक देण्याची आली. कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, सोलापुरातील मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

आंदोलकांसोबत झालेल्या झटापटीमध्ये ३२ पोलीस आणि ६ अधिकारी जखमी झाले. या घटनेनंतर जालना जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून ३५० पेक्षा जास्त मराठा आंदोलकांविरूद्ध जालन्यातील गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने राज्यभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT