Jowar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Procurement : हमीभावाने ज्वारी खरेदीस आज शेवटची मुदत

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२०२४ (रब्बी) मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

शेतकरी नोंदणीचा ओघ लक्षात घेता, आता नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. नेने यांनी दिली.

राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी पूर्ण न झाल्याने ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी स्थानिकस्तरावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे सर्व संचालक मंडळांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करून राज्यातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळवून दिली आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेस मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घेऊन मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हा पणन अधिकारी नेने यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT