Foreign tour of farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Foreign Tour : तारीख आली! पण शेतकरी जाचक अटीमुळे अभ्यास दौऱ्यावर जाणार का?

Farmer international Tour : राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील प्रशिक्षणासाठी राज्यसरकारकडून योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तारीख जाहीर झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जगाच्या पाठीवर शेतीत प्रचंड बदल आणि आधुनिकीकरण होत आहे. त्याच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञाचा वापर होत असून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. यावरूनच राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी परदेश दौऱ्याची योजना राज्य सरकारकडून आखण्यात आली आहे. यासाठी आता तारीख समोर आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत इच्छूक शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. तर शेतकऱ्यांना हे अर्ज कृषी अधिकारी कार्यालय येथे ससादर करावे लागतील. दरम्यान यावेळी शासनाने घातलेल्या जाचक अटी आणि शर्थींमुळे या योजनेचा लाभ किती शेतकरी घेणार असाल सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. याच्याआधी कोरोनामुळे ही योजना थांबविण्यात आली होती. ती पुन्हा आता सुरू करण्यात आली आहे. यंदा मात्र याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

संपुर्ण खर्च उचलावा लागणार

पूर्वी शेतकऱ्यांना केवळ ५० टक्‍केच रक्कम भरावी लागत होती. पण आता या परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यालाच संपुर्ण खर्च उचलावा लागणार आहे. तर दौरा करून परतल्यावर त्यांना ती रक्कम परत केली जाणार आहे. याच पहिल्या अटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रतिसाद मिळेल का अशी शाशंकता व्यक्‍त केली जात आहे

कोणत्या देशात होणार दौरे?

जर्मनी, फॉन्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या संभावित देशाची अभ्यास दौऱ्याकरिता निवड करण्यात आली आहे.

...असे आहेत निकष

- लाभार्थी हा शेतकरी असावा.

- त्याचे नावे सातबारा, आठ- अ असावा.

- शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्‍तीला लाभ मिळेल.

- शेतकरी किमान बारावी पास हवा.

...असे आहेत निकष

- २५ ते ६० वर्षे या दरम्यान वय हवे.

- शेतकऱ्यांना १०० टक्‍के प्रवास खर्चाचा हिस्सा प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरावा लागेल व त्याचा पुरावा कृषी विभागाला सादर करावा लागेल.

- अभ्यास दौऱ्यानंतर ५० टक्‍के शासकीय अनुदान थेट बॅंक खात्यात जमा केले जाईल.

- ५० टक्‍के अनुदान केवळ एक लाख रुपयाच्या पटीत राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT