Wardha News : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीनांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविली जाते.
या योजनेतून १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर भर आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांना ५७० एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील गरीब लाभार्थ्यांसाठी २००४-०५ पासून सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविली जात आहे. भूमिहीन कुटुंबात आर्थिक स्थैर्यता निर्माण व्हावी यासाठी ही योजना आहे.
या योजनेच्या लाभासाठी व्यक्ती हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील तसेच दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे. विधवा आणि परितक्त्या महिलांना या योजने प्राधान्य दिले जाते. लाभार्थी १८ ते ६० वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायत जमीन देण्यात येते. पूर्वी जमिनीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते.
ऑगस्ट २०१८ पासून मात्र १०० टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यास शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी ६५८ एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्यापैकी ५७० एकर जमिनीचे २०२ शेतकऱ्यांना वाटप केले आहे.
त्यामुळे शासकीय योजनेतून ते आता भूमीस्वामी झाले आहेत. २०२१-२२ मध्ये आर्वी व आष्ट्री तालुक्यातील ३६ एकर जिरायती व ८१ एकर बागायती जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन ४६ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे.
यावर्षी जमीन विक्रीच्या प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. योजनेतून १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध झाल्याने शेतमजुरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत त्यांना दिलासा मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.