Land Sealing Act Agrowon
ॲग्रो विशेष

Land Sealing : चूक महागात पडली

आपली जमीन सिलिंग कायद्यामुळे सरकार जमा होईल अशी रघुनाथला भीती वाटू लागली. एवढी मोठी जमीन सरकार जमा होईल या भीतीने रघुनाथ अस्वस्थ झाला होता व काहीतरी उपाय शोधायला लागला.

शेखर गायकवाड

Land Sealing एका गावात रघुनाथ नावाचा एक शेतकरी त्याची पत्नी व त्यांच्या एका मुलासोबत राहत होता. रघुनाथकडे एकूण ५० एकर जमीन (Agriculture Land) होती. काही वर्षांनंतर शेतजमिनीचा सिलिंग कायदा (Land Sealing Act) अस्तित्वात आला.

आपली जमीन सिलिंग कायद्यामुळे सरकार जमा (Land Seize) होईल अशी रघुनाथला भीती वाटू लागली. एवढी मोठी जमीन सरकार जमा होईल या भीतीने रघुनाथ अस्वस्थ झाला होता व काहीतरी उपाय शोधायला लागला.

रघुनाथने स्वतःच्या नावावर असलेली ५० एकर जमिनीतील काही जमीन त्याच्या अज्ञान असलेल्या मुलाच्या नावावर करून घेण्याचे ठरविले. परंतु रघुनाथचा मुलगा हा केवळ १४ वर्षांचा होता.

रघुनाथचा मुलगा हा वयाने १८ वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ती जमीन स्वतंत्र खातेदार म्हणून त्याच्या नावावर करूनही सिलिंग कायद्यातून सुटका दिसत नव्हती.

रघुनाथनला वाटले अजून चार वर्षे वाट पाहण्यापेक्षा रघुनाथने स्वतःच्या मुलाचे वय कागदोपत्री वाढवून टाकले.

कागदोपत्री चार वर्षांनी मुलगा मोठा असल्याचे दाखविल्यामुळे मुलाचे वय शाळेत, महाविद्यालयात, नोकरीमध्ये सुद्धा जास्त लागले. त्याचा पुढे काय तोटा होईल हे रघुनाथच्या अजिबात लक्षात आले नाही.

मुलाला मात्र नोकरीमध्ये या वाढविलेल्या वयाचे फार मोठे नुकसान झाले. मुलाचे सर्व मित्र सरकारी नोकरीतून रिटायर्ड होण्याआधी रघुनाथचा मुलगा चार वर्षे आधी नोकरीतून रिटायर्ड झाला.

स्वतःच्या स्वार्थासाठी रघुनाथने एक गोष्ट लपविण्यासाठी केलेली दुसरी चूक त्याला व त्याच्या मुलाला अतिशय महागात पडली. शिवाय ज्या वेळेला त्या मुलाच्या बॅचमधील नोकरीमध्ये सर्वांचे प्रमोशन होण्याची वेळ आली, त्याच काळात रघुनाथचा मुलगा नोकरीतून रिटायर झाला.

रघुनाथने आपली जमीन सिलिंग कायद्यामुळे सरकार जमा होईल या भीतीने आपल्या मुलाचे वय वाढविण्यासाठी उचललेले हे पाऊल रघुनाथला व त्याच्या मुलाला किती महागात पडले, हे रघुनाथला फार उशिरा समजले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती !

सांगायचे तात्पर्य म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने केलेली वय लपविण्याची एक चूक आपल्या किती मोठे नुकसान करून जाते त्याचा हा प्रत्यय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

Umed Mall: सांगली जिल्ह्यास ‘उमेद मॉल’ मंजूर

Women Farmer Certificate: प्रत्यक्ष शेतीकामे करणाऱ्या महिलांना ‘शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT