Land Record Office Agrowon
ॲग्रो विशेष

Land Record Office : भूमी अभिलेख कार्यालये येणार एकाच छताखाली

Land Record Department : भूमी अभिलेख विभाग कात टाकत आहे. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या मुख्यालयाची इमारत पुण्यातील येरवडा येथे साकारत असून, ती दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : भूमी अभिलेख विभाग कात टाकत आहे. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या मुख्यालयाची इमारत पुण्यातील येरवडा येथे साकारत असून, ती दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या सहा मजली इमारतीत भूमी अभिलेखची विविध कार्यालये एकाच ठिकाणी असणार आहेत. त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून, लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

भूमी अभिलेख विभागाचे राज्याचे कार्यालय सध्या शहरातील मध्यवर्ती इमारतीतील विविध मजल्यांवर आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून अभिलेखासंबंधीच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठीच येरवडा येथे नवीन इमारत उभारण्याचा निर्णय या विभागाने घेतला.

या नियोजित इमारतीत जमाबंदी आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा भूमी अभिलेख आदी विविध कार्यालयांचा समावेश असणार आहे. यामुळे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जा-ये करणे सहजशक्य होणार आहे.

येरवडा येथे अडीच एकराच्या प्रशस्त जागेत ही इमारत उभारली जात असून, तिच्या उभारणीकरिता अंदाजे ६० कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रशासकीय इमारतीत विविध नकाशे एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. इतकेच नव्हे, तर इमारतीच्या भिंतींवर देखील जुन्या नकाशांची रेखाटने असणार आहेत. येथे भूमी अभिलेखासंदर्भातील विविध वस्तू, नकाशे यांचे संग्रहालयच साकारले जाणार आहे. या इमारतीलगतच जमाबंदी आयुक्तांचे निवासस्थान असणार आहे.

कार्यालयांसह जमाबंदी आयुक्तांचे निवासस्थान, दीड हजार चौरस फूट जागेत भूमी अभिलेखचे संग्रहालय, दोन ५०० आसनी ऑडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल, जी.आय.एस. कंट्रोलरूम तसेच भूमापन कार्यालय, नागरी भूमापन आणि एकत्रिकरण इत्यादी तयार केले जाणार आहेत. महिला व पुरुष अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह व भूमी अभिलेख आधुनिकीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी भूमी अभिलेख खात्याचे प्रशासकीय कामकाज चालणार आहे.
राजेंद्र गोळे, उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT