Ambarnath News : अंबरनाथ तालुक्यातील पाले येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसी जमीन मोजणीला; तसेच भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. भविष्यात जबरदस्तीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास आत्महत्या करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अंबरनाथ तालुक्यात पालेगाव व फणसीगाव येथे पाच ते सहा शेतकऱ्यांची सुमारे २५ एकर जमीन त्यांना विश्वासात न घेताच महाराष्ट्र सरकार उद्योग व्यवसायांसाठी एमआयडीसीकरीता भूसंपादन करत आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी संपादन केल्या जात आहेत.
पर्यावरण समृद्ध असलेल्या या शेतजमिनी राजकीय पुढारी आणि सरकारी अधिकारी शेतकऱ्यांचा विरोध डावलून २००६पासून फसवणूक करत आहेत. शेतजमीन मोजणी करण्यासाठी एमआयडीसी मंगळवारी (ता. २५) आली होती.
त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. तसेच, मोजणी रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले. एमआयडीसीत जमीन खरेदी करणाऱ्या कारखानदारांनी आणि त्यांच्या बांधकाम ठेकेदाराने अंगरक्षक आणून मोजणी करत आहे.
मात्र, शेतकऱ्यांसह काकोले गावचे सरपंच-उपसरपंच, शेतकरी कल्याणकारी संस्थांनी ही मोजणी उधळून लावली. या वेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पोलिस फौजफाटा, तसेच एमआयडीसीचे भूमापक महेश डोंगरे उपस्थित होते. भविष्यात जर न्याय मिळाला नाही आणि नैराश्यातून आत्महत्या केल्यास त्याला एमआयडीसी, सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.