CM Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

CM Devendra Fadnavis: भूसंपादन प्रक्रिया दलाल लॉबीने हायजॅक केली

Broker Lobby: राज्यात भूसंपादन प्रक्रियेत दलालांची लॉबी सक्रिय झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल अधिकाऱ्यांना त्यांचे हितसंबंध तोडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यासोबतच ड्रोन आणि सॅटेलाईटच्या मदतीने पारदर्शक मूल्यांकन करण्यावर भर देण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News: ‘‘राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन सुरू आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलद पारदर्शी अचूक करायची आहे. अनेक वेळा माळरानावर फळझाडे लावून जमिनींचे मूल्यांकन केले जाते आहे. यामधील तरबेज असलेल्या दलाल लॉबीने भूसंपादन प्रक्रिया हायजॅक केली आहे. त्यांचे हितसंबंध तोडा,’’ असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले.

महसूल विभागाच्या दोन दिवसीय सुरू असलेल्या राज्यस्तरीय परिषदेच्या समारोप प्रसंगी शनिवारी (ता.५) मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘भूसंपादनामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी ड्रोन, उपग्रहावरून छायाचित्रे घ्या. यावरून संबंधित जागेवर काय आहे. काय नाही हे समजेल. सध्या भूसंपादन होताना अनेक वेळा माळरानावर फळझाडे लावून जमिनींचे मूल्यांकन केले जाते आहे. यामधील तरबेज असलेल्या दलाल लॉबीने भूसंपादन प्रक्रिया हायजॅक केली आहे. त्यांचे हितसंबंध तोडा. यातून गडबड घोटाळे टाळता येतील. यासाठी पीएम गतीशक्तीचा पोर्टचा उपयोग करा आणि मासिक आढावा घ्या.’’

राज्य सरकारचे मूल्यमापन महसूल विभागावरून केले जाते. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये महसुलाची प्रतिमा चांगली असेल, तर राज्य सरकारची प्रतिमा चांगली होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आपलीच माहिती आपल्याला सल्लागार देतो हे टाळा...

महसूल विभाग हा प्राचीन राज्यपद्धतीत देखील होता. चाणक्याच्या अर्थशास्त्रात महसुलाची रचना पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आज्ञावली’ प्रमाणेच आत्ताचे ‘शासन निर्णय’ असतात. शिवरायांची महसूल यंत्रणा बळकट होती. आपले सध्याचे महसूल संकलन पद्धत इंग्रजांनी केलेली आहे. यामध्ये नवनवीन तंत्राचा वापर करून योजना करण्याची गरज आहे. मात्र, हे करताना नवीन विचार करायचा असेल तर सल्लागार नेमतो.

सल्लागार कंपनी आपल्यालाच आपल्या समस्या आणि उपाय विचारतात आणि सुंदर शब्दात आपल्यालाच देतात आणि त्यांचाच अहवाल आपण स्वीकारतो. आपल्याला समस्या आणि त्यावरील उपाय माहीत आहेत. या अनुभवावरूनच आज जमिनीचे मॅन्युअल केले आहे. हे मॅन्युअल नसून ‘महसूल गीता’ करण्याचे काम जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्र करून एआयच्या माध्यमातून केले आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो.

‘राज्यमंत्री कदम म्हणाले,‘‘महसूल विभाग शासनाचा कणा आहे. महसूल अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. ताण असला तरी चांगले अधिकारी अवघड कामे सोपी करतात. ताण कमी करण्यासाठी डिजिटल सेवा ५ वर्षांत गतिमान केल्यावर निम्मा ताण कमी होईल. १०० दिवसांमध्ये काम करताना वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. व्यासपीठावर मी नवखा आहे. मी राज्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतला तेव्हा आढावा घेण्यासाठी मॅन्युअल शोधत होतो, ते मॅन्युअल आज मला मिळाले.’’ या वेळी प्रास्ताविक सचिव राजेशकुमार यांनी केले, तर आभार विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी मानले.

पुढील पाच वर्षांच्या कामांची मुहूर्तमेढ १०० दिवसांत

‘‘राज्य सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामांची मुहूर्तमेढ १०० दिवसांच्या माध्यमातून केली. विविध कामांच्या प्रणालीचे रेड, यलो, ग्रीन कार्यपद्धती सुरू आहे. याचे उद्दिष्ट साध्य होत आहेत.

माहितीच्या अधिकारातील तक्रारी आणि माहितीचे पत्र देण्याची गरजच पडली नाही पाहिजे असे काम करा. तक्रारीची माहिती वेबसाइटवर टाका आणि तक्रारदाराला वेबसाइट बघायला सांगा असे काम करा,’’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तक्रार निवारण वेळेवर करा

अनेक अधिकाऱ्यांना कार्यालयात बसूनच काम करण्याची सवय आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाण नसते. यासाठी क्षेत्रीय भेटी सातत्याने व्हायला पाहिजे. कामात सकारात्मकता पाहिजे आपण लोकांचे सेवक आहोत मालक नाही. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. चांगली कामे केली तर नागरिक अधिकाऱ्यांची बदली रद्द करा अशी मागणी करतात. यासाठी लोकांमध्ये मिसळले पाहिजे. गावखेड्यांमध्ये भेटी दिल्या की समस्या समजतात. यातून तक्रार निवारण वेळेवर झाले पाहिजे प्रामाणिकपणे लोकशाही दिन साजरा झाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘सुधारण्याची संधी देऊ’

सर्वसामान्य नागरिकांना तलाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर समाधान वाटले पाहिजे. यासाठी कार्यालये स्वच्छ नीटनेटकी ठेवा. यासाठी १२ हजार ४३६ कार्यालयांचे मूल्यमापन होणार आहे. यात काम न करणाऱ्यांना सुधारण्याची संधी देऊ १ मे रोजी या कामांचे मूल्यमापन होणार आहे.

‘जिल्ह्यातील एक गाव पर्यटन स्थळ विकसित करा’

१०० दिवसांच्या कार्यक्रमात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे एका पर्यटन स्थळ निवड करायची आहे. त्या गावांचा विकास स्वच्छता सोयीसुविधा द्यायच्या आहेत. सर्वोत्तम कामांचे गौरव करणार, हाच कार्यक्रम स्केलवर नेता येईल पर्यटनवाढीसाठी काम करायचे आहे.

‘आयुक्तांचे गट स्थापन करणार’

सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करून महसूल कार्यप्रणाली गतिमान करण्यासाठी विविध संकल्पना सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT