Banana Export  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : लाखनवाड्याचा शेतकरी पिकवतोय निर्यातक्षम केळी ; एकात्मिक शेती पद्धती ठरली दिशादर्शक

Banana Farming : खामगाव तालुक्यात डोंगरीभागात वसलेल्या लाखनवाडा गावातील तरुण शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत असून विविध अडचणींवर मात करीत एकात्मिक शेती पद्धतीतून विकासाची कास त्यांनी धरली आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा ः खामगाव तालुक्यात डोंगरीभागात वसलेल्या लाखनवाडा गावातील तरुण शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत असून विविध अडचणींवर मात करीत एकात्मिक शेती पद्धतीतून विकासाची कास त्यांनी धरली आहे. फळबाग, शेळी-मेंढीपालन, मत्स्यशेती अशा माध्यमातून जडणघडण सुरू आहे. यंदा त्यांची केळी देशातील विविध राज्यांसह नेपाळसुद्धा गेली आहे.

लाखनवाडा हे अजिंठा डोंगररांगेत वसलेले गाव आहे. हे गाव डोंगरी विभागात असल्यामुळे गावाला व शेतीला लागून जंगल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रानडुक्कर, निलगाय यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. अशाही स्थितीत लाखनवाडा गावातील श्याम रामदास पांढरे या तरुण शेतकऱ्याने कुटुंबाच्या १२ एकर शेतीत विविध प्रयोग सुरू केले. प्रामुख्याने फळशेतीत पाऊल ठेवत दर्जेदार केळी उत्पादनात बाजी मारली.

केळीचे पीक केले फायदेशीर
आठ एकरात केळी लागवड करताना पारंपरिक पद्धतीऐवजी नवनवीन प्रयोग केले. दोन तासातील अंतर आठ फूट तर दोन झाडांतील चार फूट एवढे ठेवले. यामुळे संपूर्ण बागेत योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश तसेच वारा मिळू लागला. परिणामी प्रत्येक झाडाची योग्य वाढ झाली. शिवाय दमदार झाडावर घडही चांगले पडले. मात्र, संपूर्ण घडाची लालसा न करता त्यावरील खालच्या बाजूच्या काही फण्या काढून टाकल्या.

परिणामी घडावरील आठ ते नऊ फण्यांची जोरदार वाढ झाली. या भागात कुणाची केळी अशा पद्धतीने बनलेली नाही. पिकात नैसर्गिक व जैविक पद्धतीच्या व्यवस्थापनाचाही फायदा झाला. लेंडी खत, कोंबडी खत, गांडूळ खताच्या वापरामुळे चांगल्या प्रकारची दर्जेदार केळी उत्पादित करण्यात यश आले. या बागेतून सुमारे १९०० क्विंटलपेक्षा अधिक माल निघाला. सरासरी दीह हजारांचा दर मिळाला आहे. ही केळी जम्मू-काश्‍मीर, श्रीनगर, राजस्थान, पंजाब या राज्यांसह व्यापाऱ्यांमार्फत नेपाळलासुद्धा पाठवली गेल्याचे श्‍याम पांढरे यांनी सांगितले.

शेतीत केळी उत्पादनासाठी कृषी सहायक ढोरे, केव्हीकेचे शास्त्रज्ञ प्रा. संजय उमाळे, मामा आण्णा हरी पाटील यांचे नैसर्गिक शेती कशी करायची, केळी व कापूस लागवडीसंदर्भात मार्गदर्शन फायदेशीर ठरले. या शेतीला जोडूनच कुक्कुटपालन, शेळी व मेंढीपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केल्याने कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे श्‍याम यांनी सांगितले. या भागात केळीचे फारसे क्षेत्र नाही. अशा परिस्थितीत पांढरे यांनी नावीन्यपूर्ण व्यवस्थापन करून निर्यातक्षम उत्पादनाचा ध्यास धरला आहे. त्यात ते यशस्वीही होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Farmer Income: शेतकऱ्यांचं चांगभलं!

Ginger Price: आले बियाण्याच्या गाडीला २५ ते २६ हजार रुपये दर

Summer Weather Alert: उन्हाच्या चटक्यात सातत्यपूर्ण वाढ वादळी पावसाचा अंदाज कायम

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Farm Labour Shortage: शेतमजुरांची टंचाई; सालगडी मजुरी अडीच लाखांवर

SCROLL FOR NEXT