Ladaki Bahin March Update Agrowon
ॲग्रो विशेष

Ladaki Bahin March Update : लाडक्या बहिणीला मिळणार ८ मार्च रोजी ३ हजार रुपये; अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केल्या पुरवणी मागण्या

majhi ladaki bahin yojana : फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिल्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका करण्यात आली. त्यामुळे आता दोन्ही म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

Dhananjay Sanap

Aditi Tatkare on ladaki bahin : राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर महिला दिनादिवशी २ महिन्यांच्या हप्त्याचा लाभ एकत्र जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला दिनाचं गिफ्ट महिलांना मिळणार आहे. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या रखडलेल्या अनुदानासाठी २ हजार १३३ रुपयांच्या मागण्या आहेत. तर ग्रामीण विकाससाठी ३ हजार ६ कोटी रुपये आणि उद्योग व ऊर्जा, कामगार विभागासाठी १ हजार ६८८ कोटी रुपये तर शहर विकास विभागासाठी ५९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिल्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका करण्यात आली. त्यामुळे आता दोन्ही म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

विरोधकांनी सुरुवातीपासून योजना खुपत असल्याचं म्हणत राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मंत्री तटकरे म्हणाल्या, "विरोधकांना सुरुवातीपासून ही योजना खुपते आहे. विरोधकांना त्यामुळे नैराश्य आलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यात शेवटाला आपण तो देऊ." असं तटकरे यांनी सांगितलं आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील २.५ कोटीहून अधिक महिलांना महिन्याला १५०० हजार रुपयांचा लाभ देण्यास सुरूवात केली. तसेच या योजनेचा हप्ता निवडणुकीनंतर २१०० रुपये महिना करण्याचं आश्वासन दिलं.

त्यामुळे निवडणुकीत अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं. परंतु निवडणुकीनंतर मात्र महायुती सरकारने योजनेच्या निकष व अटी कठोर करत लाखों महिलांना योजनेसाठी अपात्र केलं. तसेच फेब्रुवारीचा हप्ताही वितरित करण्यात आला नाही. त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. परंतु सरकारने दोन महिन्यांचा लाभ ८ मार्च रोजी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेचा हप्ता १५०० वरुन २१०० रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा महिलांना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योजनेचा हप्ता २१०० रुपये करण्याची ग्वाही दिलेली आहे. परंतु त्याकडे काणाडोळा करत योजनेतील लभार्थी महिलांना मोठ्या प्रमाणात कात्री लावल्याने महिलामध्ये नाराजी देखील आहे.

दरम्यान, लाडकी बहिण योजनेत राज्यातील जवळपास ८३ टक्के महिला विवाहित आहेत. तर अविवाहित महिलांची संख्या ११ टक्के इतकी असून विधवा महिलांची संख्या ४.७ टक्के आहे. तसेच घटस्फोटीत, निराधार महिलांचा एकत्रित संख्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तर वयोगटानुसार सर्वाधिक २९ टक्के लाभार्थी महिला ह्या ३० ते ३९ वयोगटातील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT