Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कापसाच्या वेचणीत मजूरटंचाईची समस्या

Labor Shortage : कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतातच कापसाचे उंदीर व अन्य किटक नुकसान करीत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतातच कापसाचे उंदीर व अन्य किटक नुकसान करीत आहेत. यात कापसाचा दर्जाही खराब होत आहे. शेतकरी कमी दर व मंजूरटंचाईला वैतागले आहेत.

खानदेशात शेतकऱ्यांनी कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड केली आहे. सुरवातीला कमी पाऊस होता. त्यात नुकसान झाले. नंतर बेमोसमी पावसामुळे कापूस भिजला. दिवाळीनंतर मजूरटंचाई सुरू झाली. पुढे मजुरांनी कापूस वेचणीकडे पाठ फिरवली.

सद्यःस्थितीत एकाच वेळी अनेक भागात शेतीकामे सुरू आहेत. त्यात हरभरा, मक्यात तणनियंत्रण व इतर कामे सुरू आहेत. मजूरटंचाई कायम आहे. परिणामी २० रुपये किलो वेचणीचा दर देऊनही मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे.

चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सातपुड्यातून मजूर येतात. त्यांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिमाणसी ५० ते ६० रुपये खर्च करावा लागतो. कापसाचे दर मात्र सतत कमी झाले आहेत.

यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कमी दर्जाच्या कापसाला व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात आहे. शासकीय खरेदी केंद्रात कमी दर्जाचा कापूस घेतला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी झाली आहे.

कापूस वेचणी परवडेना

कापूस वेचणीचे काम आता अडचणीचे व अधिक श्रमाचेही आहे. कारण बोंडे व्यवस्थित काढता येत नाहीत. वेळ अधिक लागतो. शिवाय २० रुपये प्रतिकिलो दरात कापूस वेचणी परवडत नाही, असे मजूर म्हणतात.

आठ ते १० दिवस सतत विनवण्या करूनही मजूर शेतात कापूस वेचणीला येत नाहीत. त्यांना अधिकची मजुरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते येतात. दुपारी अनेकदा त्यांना वेळेआधी घरी सोडावे लागते. यात शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT