Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : खानदेशात मजूरटंचाई वाढली

Cotton Picking : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. परंतु पिकात या महिन्यातील पावसाने तणही वाढले आहे. आता सणासुदीसह इतर कारणांमुळे मजूरटंचाई जाणवू लागली आहे.

शेतकरी तणनाशकांचा वापर यंदा अधिक करीत होते. कारण मजूरटंचाई कायम होती. तसेच मजुरी दर कमी करावेत, प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेती मजूरटंचाई, महागाई यामुळे संकटात आहे.

हमीभाव जाहीर झाले, पण तेवढे दर शेतकऱ्यांना मिळतच नाहीत. पण हमीभाव वाढले की, मजुरीचे दरही वाढवा, अशी मागणी ग्रामीण भागात सुरू होते. मजूरटंचाईतच शेतीकामे शेतकरी उरकून घेत आहेत. शेतमालाचे दर गेले दोन वर्षे अपवाद वगळता सर्वच शेतकऱ्यांना हवे तसे मिळालेच नाहीत.

कापसाला दर गेले दोन वर्षे सरासरी साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाले. कापसाचा हमीभाव गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनाच अपवादाने मिळाला. हमीभाव वाढविण्याची कार्यवाही यंदाही झाली.

पण हमीभाव अजूनही कुठेही मिळत नसल्याची स्थिती आहे. हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याने अडचणी आहेत. अशात मजूर मजूर शेतकऱ्यांची कोंडी करीत आहेत. सध्या पूर्वहंगामी कापूस, केळी, पपई व अन्य पिकांत काढणी, वेचणी सुरू आहे. मजूरटंचाईंमुळे शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे.

शेतकरी लगतच्या गावातून किंवा इतर गावांमधून मजूर उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. २०० ते १८० रुपये रोज, अशी मजुरी कापूस पिकात वेचणीसाठी दिली जात आहे. मजुरी दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT