Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Payment : ऊसबिले न देताच दिल्याचा अहवाल, कुर्मदास कारखान्याविरोधात तक्रार

Sugarcane FRP : संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केली असता कारखान्याने काही शेतकऱ्यांची उसाची रक्कम अद्याप दिली नसल्याचे कबूल केले.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न देताच ती दिली असल्याची माहिती प्रशासनाला कळवल्यावरुन भैरवनाथ शुगरवर कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच, आता माढा तालुक्यातील कुर्मदास साखर कारखान्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तक्रार केली आहे. तसेच कारखान्याच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

काही शेतकऱ्यांनी ऊसबिले न मिळाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केली असता कारखान्याने काही शेतकऱ्यांची उसाची रक्कम अद्याप दिली नसल्याचे कबूल केले.

यामुळे संघटनेने कारखान्याच्या ऊसबिल रकमेबाबतच्या व्यवहाराची चौकशी करावी व खोटी कागदपत्रे देऊन शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र साखर आयुक्तांना दिले.

या पत्राच्या आधारे सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार सहसंचालकांनी कुर्मदास साखर कारखान्याला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, काही शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडून दमदाठी झाल्याचा प्रकारही घडला, त्यामुळे आम्ही कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT