Sheep Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sheep Farming : कुरमार समाजाची शाश्‍वत मेंढीपालनाकडे वाटचाल

Diwali Article 2024 : कुरमार जमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आढळते. मेंढीपालन हेच या जमातीचे पारंपरिक उदनिर्वाहाचे साधन आहे. या जमातीची लोकसंख्या जवळपास १५ हजारांपर्यंत आहे.

Team Agrowon

राहुल दिवाकर डंकरवार

Kurmar Community : मेंढीपालक समाज म्हणून कुरमार जमातीची विशेष ओळख आहे. ही जमात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातही त्यांचे वास्तव्य दिसून येते. मेंढीपालन हेच या जमातीचे पारंपरीक उदनिर्वाहाचे साधन आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, मुल, सावली, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, वडसा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने १८ गावांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जमात इतर तालुक्यांमध्ये विरळ असल्याने आढळून येते. या जमातीची लोकसंख्या जवळपास १५ हजारांपर्यंत आहे. मेंढपाळ व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी भटकंती करत मेंढ्यांचे पालनपोषणा करून त्यातील येणाऱ्या उत्पन्नावर हे लोक जगतात.

पूर्वी भटकंती करत असणारा हा समाज आता चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत बऱ्यापैकी स्थिरावला आहे. आपल्या सामाजिक विकासाकडे लक्ष देत आहे. आजही समाजातील ४० ते ५० टक्के लोक भटके पशुपालक आहेत तर काही लोक बंदिस्त पद्धतीने गावातच मेंढीपालनाचा व्यवसाय करत आहेत. त्याचे उत्तम उदाहरण बेंबाळ या गावी बघायला मिळते.

बेंबाळ हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वसलेले असून पाच हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. या गावात कुरमार समाजाच्या लोकांची संख्या जवळपास अडीचशेच्या आसपास आहे. आजच्या युगात आपल्या समाजाचा टिकाव लागायचा, तर सामाजिक बदलाची गरज आहे, हे ओळखून या समाजातील शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे ठरवले. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी ओळखले.

या तरुणांनी एकत्रित येऊन २०१८ मध्ये जय मल्हार युवा सेना ही सामाजिक संघटना स्थापन केली. या संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. दरवर्षी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येते. कुरमार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा दैवत मंदिराचे बांधकाम रखडले होते. धार्मिक एकोपा आणि रूढी-परंपरा टिकविण्यासाठी गावातील सर्वांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

Soybean Disease: सोयाबीन पिवळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना

Goat Farming: शेळीपालनात तयार झाली नवी ओळख

Women in Agri Business: प्रक्रिया उद्योगातून वाढल्या व्यावसायिक संधी

SCROLL FOR NEXT