Kukadi Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Kukadi Irrigation : कुकडीचे रब्बीसाठी दोन आवर्तन देण्याचा निर्णय: राधाकृष्ण विखे पाटील

Rabbi Irrigation : कुकडी, घोड प्रकल्पांतील ७० टक्के लाभक्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अहिल्यानगरला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : कुकडी, घोड प्रकल्पांतील ७० टक्के लाभक्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अहिल्यानगरला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली आहे. कुकडीतून रब्बीसाठी दोन तर घोडमधून चार आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मेंढागीरी समितीचा अहवाल आमच्या आधी झालेला आहे. मात्र त्याबाबत लवकरच होत असलेल्या गोदावरी खोरेच्या बैठकीत त्याबाबत आढावा घेतला जाईल. मराठवाड्यावर पाण्याबाबत कोणताही अन्याय होणार नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
अहिल्यानगर येथे सोमवारी (ता. ६) जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार काशीनाथ दाते, आमदार शरद सोनवणे यांच्यासह लोकप्रतिनिधी, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की कुकडीचे पहिले आवर्तन सुरू असून १४ जानेवारीपर्यंत ते सुरू राहील. दुसरे आवर्तन पुढील महिन्यात होईल.

दोन्ही आवर्तने संपल्यावर पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. टेलपर्यंत पाणी देण्याचे आदेश दिलेले असून जेथे अडचणी असतील तेथे पोलिस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदा पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असल्याने पाण्याचे यशस्वीपणे नियोजन होईल. पिंपळगाव जोगामधून पाणी येत नसल्याचे काशीनाथ दाते यांनी सांगितले असून त्याबाबत कार्यवाही होईल. १० जानेवारीला निळवंडे- भंडारदरा कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्याचा असलेला निकष ६५ टक्क्यांऐवजी ५८ टक्क्यांपर्यंत करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेंढागिरी) समितीने शासनाकडे केली असल्याबाबत आपल्याला माहिती नाही.

आमच्या आधीचा हा निर्णय आहे. त्याबाबत दोन दिवसांत होणाऱ्या गोदावरी खोरेच्या बैठकीत त्याबाबत आढावा घेतला जाईल. मराठवाड्यावर कोणत्याही प्रकारे पाण्याबाबत अन्याय केला जाणार नाही. त्यावर मार्ग काढू असे विखे पाटील म्हणाले. कुकडी प्रकल्पाचे नियंत्रण अधीक्षक अभियंता यांच्याकडे आहे. त्यामुळे ते कार्यालय अहिल्यानगरला आणण्यासाठी एखादे कार्यकारी अभियंता पद निर्माण करता येईल का याबाबत विचार सुरू आहे. कुकडी प्रकल्पात पश्चिम वाहिन्याचे पाणी आणण्याचाही प्रयत्न असेल.

जलसंपदा खाते मिळाल्याने स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे पश्चिम वाहिन्याचे पाणी पूर्वेला वळवून दुष्काळमुक्ती करण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील गरजेनुसार धरणातील गाळ काढण्याचा आणि उंची वाढवण्याबाबतचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे.



धस यांनी मुख्यमंत्र्याकडे पुरावे द्यावेत
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. विधानसभेतील पराभवामुळे नैराश्य आले असल्याने विरोधक देशमुख प्रकरणात राजीनामा मागत राजकारण करत आहेत. एसआयटीचा अहवाल येऊ द्या, त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. आमदार सुरेश धस यांनी खंडणी प्रकरणात केलेल्या आरोपाबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील. त्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT