Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Nar-Par River valley : ‘नार-पार’साठी आरपारच्या लढाईचा निर्धार

Water Issue : गिरणा खोरे अतितुटीचे खोरे असताना, हक्काच्या नार पार योजनेतील पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘कसमादे’सह खानदेश पेटला आहे.

Team Agrowon

Nashik News : गिरणा खोरे अतितुटीचे खोरे असताना, हक्काच्या नार पार योजनेतील पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘कसमादे’सह खानदेश पेटला आहे. यापूर्वी उकाई घरण असो वा नर्मदा असो, आमच्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. ‘नार-पार’ खोऱ्यातील हक्काचे कमीत कमी ३० टीएमसी पाणी मिळाले असते, तर गिरणा खोरे समृद्ध झाले असते.

ही लढाई निवडणूक पार करण्यासाठी नसून आमच्या हक्कासाठी आहे. आम्ही आता नार पारची लढाई गावोगावी जाऊन आर पार लढू, असा निर्धार माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला. गिरणा धरण (ता. नांदगाव) येथे बुधवारी (ता. ४) नार-पार गिरणा खोरे बचाव कृती समितीची निर्धार बैठक झाली. या वेळी पाटील बोलत होते.

सुरुवातीला गिरणा धरणाचे जलपूजन करून ओटी खणानारळाने भरण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, खानदेशी हितसंग्रामचे भय्यासाहेव पाटील, बापूसाहेब हटकर, वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. अहिरे, निखिल पवार, कळमदरीचे सरपंच शेखर पगार, गिरणा-मन्याडचे विवेक रणदिवे, पांझण डावा कालवा समितीचे अॅड. राजेंद्र सोनवणे, बाजार समितीचे माजी उपसभापती महेंद्र पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, ज्येष्ठ नेते के. आर. पाटील आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की गोदावरी खोरे समृद्ध असताना, तेथील पुढारी नार पारचे पाणी पळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येथील मंत्री मात्र हातावर हात ठेवून बसले असून, बघ्याची भूमिका घेत आहेत. जलसमाधी आंदोलनानंतर आता शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जागृती करण्यासाठी मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे,

त्यादृष्टीने सर्वांच्या सूचनेनुसार कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यावर काम करायचे आहे. यापुढे एक नेता, एक संघटना या माध्यमातून एकत्र येऊन गिरणा समृद्धीचा निर्धार केला आहे. बैठकीला खानदेशी हितसंग्राम समिती कल्याण, गिरणा मन्याड बचाव समिती, पांझण डावा कालवा बचाव समिती, वांजूळ पाणी समिती, खानदेश जलपरिषद, जामदा कालवा समिती, मिशन ५०० कोटी लिटर आदी विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

Agrowon Podcast: सोयाबीनवरील दबाव कायम; मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT