Krishna Flood Control Committee agrowon
ॲग्रो विशेष

Krishna Flood Control Committee : ‘पाटबंधारे’च्या निष्काळजीपणामुळे कोल्हापुरातील बंधारे पाण्याखाली'

Krishna Flood Control : कृष्णा महापूर नियंत्रण समितीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Irrigation Department : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या शेतीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. किरकोळ झालेल्या पावसाने ७ बंधारे पाण्याखाली कसे गेले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण समितीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. पाण्याचा योग्य पद्धतीने विसर्ग न झाल्याने बंधारे पाण्याखाली गेल्याचा आरोप करण्यात समितीने केला आहे.

कृती समितीने याबाबत जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, हिप्परगी बॅरेजचे २२ पैकी १६ दरवाजे बंद केले आहेत. येथे येणारा विसर्ग हा २१००० क्युसेक्स इतका आहे. येथील उघडलेल्या सहा दरवाजातून १२००० क्युसेक्स पाणी प्रवाहित होत आहे. येथील पाण्याच्या फुगीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर व तेरवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे वाहून आलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने विसर्ग न झाल्याने राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. याला कोल्हापूर पाटबंधारे विभाग जबाबदार आहे, असा आरोप आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने (सांगली)ने केला.

याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच, ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगीचे सर्व दरवाजे खुले ठेवावेत व आलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७ मीटरपेक्षा जादा ठेवू नये, अशी मागणी समितीने आज निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठविले.

निवेदनात म्हटले आहे की, कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवून विसर्ग खाली सोडण्यावर चर्चा झाली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्य करत कार्यवाहीबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बंधारे पाण्याखाली ही परिस्थिती ३० जूनलाच उद्‌भवली आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी २.५४ , तुळशी १.३३, वारणा ११.८५, दूधगंगा ४.५३, कासारी ०.९२, कडवी १.२८, कुंभी ०.९२, पाटगाव १.६१, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५६, जंगमहट्टी ०.४९, घटप्रभा १.४३, जांबरे ०.५४, आंबेआहोळ ०.८९, सर्फनाला ०.०३ व कोदे लघु प्रकल्प ०.०८ इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात

राजाराम १७.१०, सुर्वे १९.५, रुई ४५, इचलकरंजी ४३.२, तेरवाड ३९.९, शिरोळ ३१, नृसिंहवाडी २४, राजापूर १३.६ तर नजीकच्या सांगली ७.९ व अंकली ८.१ अशी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT