Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : बिद्री कारखाना के.पी. पाटलांकडे, २५ जागांवर विजय, सत्ता ठेवली अबाधित

K P Patil : के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

sandeep Shirguppe

Bidri Sugar Election : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधीक सभासद असलेल्या तसेच जिल्ह्यात मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली.

विरोधी गटाचे आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. सुमारे सात हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी सत्ताधाऱ्यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली.

'बिद्री'त सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीविरोधात आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांनी परिवर्तनचे तगडे आव्हान उभे केले होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत परिवर्तनने प्रचारात जोरदार हवा निर्माण केली; परंतु त्यांना हा उत्साह मतदानात रूपांतरित करता आला नाही. विरोधी आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

यांनी केले नेतृत्व

सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयवावा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केले. विरोधी राजयों शाहू शेतकरी परिवर्तन विकास आपाडीचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजित घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील यांनी केले.

विरोधकांचा काढता पाय

निकालाचा कल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाताना दिसताच मतमोजणी ठिकाणावरून विरोधर्धा आघाडीच्या उमेदवारांनी हळूहळू काढता पाय घेतला, विजयाची खात्री होताच आघाडीचे प्रमुख के. पी. पाटील व अन्य उमेदवार दुपारी दोनच्या सुमारास केंद्रावर आले. उत्साही कार्यकत्र्यानी त्यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला.

स्वाभिमानीने घेतली लक्षवेधी मते

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पोवार गट क्रमांक दोन राधानगरीमधून, तर बाळासाहेब पाटील गट क्रमांक तौन कागलमधून रिंगणात होते. पहिल्या फेरीत अजित पोवार यांनी १९६६, वर बाळासाहेब पाटील यांनी १६१८ मते घेतली. दुसऱ्या फेरीतही त्यांनी चांगली मते घेतली.

सत्यजित जाधवांना सर्वाधिक मते

सत्तारूढ आघाडीचे गट क्रमांक सहा भुदरगडमधील उमेदवार सत्यजित जाधव यांना सर्वाधिक २९ हजार १०१ मते मिळाली. के. पी. पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची २८ हजार ६९३ मते मिळाली. सत्तारूढ़ गटात सर्वात कमी मते कागल गटातील रणनित मुडकशिवाले यांना (२५ हजार ९९९ मते) मिळाली.

सत्तारूढ गटाचे उमेदवार कमीत कमी चार हजार ते जास्तीत सात हजार ४०१ मतांनी विजयी झाले. विरोधी आघाडीत सर्वाधिक २२ हजार ७४८ मते जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांना पडली, विद्यमान संचालक ए, वाय, यांना २१ हजार ७०० मते पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT