कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. agrowon
ॲग्रो विशेष

Rain Red Alert : कोयना, राधानगरी, काळम्मावाडी, वारणा धरणांची स्थिती अशी; कोल्हापूरला ऑरेंज, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यासह सर्वभागात पावसाची संततधार आज (ता.२२) चौथ्या दिवशीही सुरू होती. शहरासह सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. धरणक्षेत्रातही पावसाची दमदार बरसात झाल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. एक तासाने पाणी पातळी १ इंचाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली होती आज सायंकाळी ६ वाजता ३९.६ इंच झाली आहे. अशीच वाढ होत राहिल्यास पुढच्या २४ तासांत पंचगंगा नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पश्चिम भागातील शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८.४ मिमी पाऊस पडला. तर ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने कळे-गगनबावडा, रत्नागिरी-कोल्हापूर ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

धरण क्षेत्रात जोरदार

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जांबरे’, ‘घटप्रभा’, ‘जंगमहट्टी’, ‘आंबेओहोळ’ ही चार धरणे भरली आहेत. ‘कडवी’ ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्क्यांच्या पुढे गेले आहे तर काळम्मावाडी धरणाचा पाणीासाठा ६० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

सांगली जिल्ह्यातील वारणा ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. पश्चिम घाटात आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील २४ तास हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान होत असलेल्या पावसाने पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत असल्याने जिल्ह्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नदी काठच्या गावांना सुरक्षीत स्थळी हलवण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. पुढील २४ तास पावसाने संततधार ठेवल्यास धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

एसटीच्या ६५ फेऱ्या रद्द

पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. यातून महामंडळाचे मागच्या २४ तासात ७५ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे तर काल आणि आज दोन दिवसांत १०० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही मार्ग पूर्णपणे बंद केले असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खोकुर्ले, मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटी रद्द केल्या.

रंकाळा बसस्थानकातून मानबेटकडे धावणारी एसटी पुलावर पाणी आल्याने अंशत: बंद आहे. ऐनापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने गडहिंग्लज आगारातून कोवाडपर्यंत धावणारी एसटी अंशत: बंद आहे. गारगोटी ते मुरगुड मार्ग आणि चंदगड ते पारगड मार्ग बंद आहे. कागल ते मुरगुड मार्ग बंद असून, भडगाव पुलावर पाणी आल्याने आजरा ते साळगावपर्यंत पूर्ण वाहतूक बंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT