Sangli Krushna River : कोयना धरणातून सोडलेले पाणी सहा दिवस अन् सहा तासांनंतर काल(ता.०२) सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीच्या सांगली हद्दीत दाखल झाले. दरम्यान सांगलीकरांची पहाट नदी भरलेली दिसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
लगोलग आणखी एक टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन येत्या पाच तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे.
कोयना धरणातून काल दुपारी १२ वाजता पाणी सोडण्यात आले. प्रारंभी १०५० क्यूसेक आणि त्याच दिवशी रात्री २१०० क्यूसेकने पाणी विसर्ग करण्यात आले. दोन दिवसांत पाणी येणे अपेक्षित होते.
मात्र नदीपात्र पूर्ण कोरडे पडले होते. त्यामुळे सहा दिवसांचा कालावधी लागला. या घटनेतून पाटबंधारे विभाग, कोयना धरण व्यवस्थापन आणि सांगली व सातारा जिल्हा प्रशासन काही धडा घेणार आहे का, हाच कळीचा मुद्दा आहे.
कृष्णा नदी पंधरा दिवसांहून अधिक कोरडी राहण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे. सांगलीत पिण्याच्या पाण्याला वास येऊ लागला, एवढी बिकट अवस्था झाली. यावर्षी कोयना धरणात १६ टीएमसी कमी पाणी आहे.
त्यामुळे सिंचन योजनांच्या पाण्याला दहा टक्के कपातीचा झटका बसणार आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची कपात नसली तरी पाणी जपून वापरण्याचे आव्हान असेल. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर यावेळी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्याबाबत काय हालचाली होतात, हे पाहावे लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.