Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरण ९९ टीएमसी, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Krishna River Water : चोवीस तासात तब्बल दोन टीएमसी पाण्याची आवक धरणात वाढली आहे. सकाळी धरणाची पाणी पातळी ९८.८९ टीएमसी होती.

sandeep Shirguppe

Koyna Dam Satara : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने कोयना धरण ८० टक्के भरले होते यंदा कोयना १०० टक्के भरणार का याकडे उत्सुकता लागली होती. परंतु मागच्या दोन दिवसातं कऱ्हाड व पाटण तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाण्याच्या पातळीने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे. चोवीस तासात तब्बल दोन टीएमसी पाण्याची आवक धरणात वाढली आहे. सकाळी धरणाची पाणी पातळी ९८.८९ टीएमसी होती.

धरणात ३८ हजार २७१ क्यसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पायथा वीज गृहाचे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून २१०० क्युसेक पाणी नदी पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

कोयना परिसरात चोवीस तासात १३६, नवजाला १३९ तर महाबळेश्वरला १४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना विभागात आजअखेर चार हजार ७७०, नवजाला पाच हजार ६३० तर महाबळेश्वरला पाच हजार ४०७ मिलीमाटर पाऊस झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

संततधार पावसाने कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अवघ्या चोवीस तासात दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत पाच फुटाने वाढ झाली आहे. कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पाच फुटाने वाढ झाली होती. कृष्णा १४ तर कोयनेची पाणी पातळी ३३ फूट होती.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळ ११ वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT