Department Of Revenue Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Department Update : शहाद्यातील दहा मंडळांमध्ये कोतवाल पदे रिक्त

Talathi Office : मोगलांच्या काळात गाव पातळीवर स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पूर्वीपासून कोतवालाचे पद निर्मिती करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nandurbar News : मोगलांच्या काळात गाव पातळीवर स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पूर्वीपासून कोतवालाचे पद निर्मिती करण्यात आले आहे. सुरुवातीला कोतवालांची पदे वंश परंपरागत पद्धतीने भरली जात होती.

मात्र आता सध्या शासनाच्या बदलत्या नियमानुसार पदाची निवड परीक्षेद्वारे करण्यात येते, मात्र या निवडीला गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात स्थगिती असल्याने एकूण दहा मंडळामध्ये कोतवाल पद रिक्त आहेत. संबंधित तलाठी, पोलिस पाटील यांनाच कोतवालाची कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे.

पोलिस पाटील, तलाठी यांना मदतीसाठी काम करणारा कोतवाल हा चतुर्थ श्रेणीतील घटक आहे. कोतवाल पदे रिक्त असल्याने संबंधित तलाठी, पोलिस पाटील यांना त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्त पदांची माहिती

शहादा मंडळ - शहादा, मलोणी, तिखोरा,कुकडेल, लोणखेडा- पुरुषोत्तमनगर, टेंभली, मोहीदे, अनरद - मुख्यालय - पूसनद,डोंगरगाव, - सावळदा मुख्यालय - वरूळ, कानडी, सोनवद मुख्यालय अंतर्गत कवठळ, सावखेडा मुख्यालय अंतर्गत कमरावद, वडछिल, मंदाणा मंडळामध्ये सजा जावदे जाम ओझर्टा,

भोरटेक, लंगडी, चांदसैली, मलगाव, मानमोडया, शहाणा, भुलाने, असलोद, न्यू असलोद मुख्यालय अंतर्गत दुधखेडा,पिंपर्डे, कर्जोत मुख्यालय अंतर्गत - कलमाड, तिधारे, लोहारा, भागापूर मुख्यालय अंतर्गत - जवखेडा, पाडळदा, म्हसावद मंडळ- चिखली बु. मुख्यालय- अंतर्गत - बुडीगव्हाण, कानडी, उमर्टी,शिरूड, राणीपुर मुख्यालय - पि प्राणी, चिरडे, कोटबाधणी, नागझिरी,

फत्तेपूर मुख्यालय अंतर्गत दरा, मडकाणी, रामपूर, तलावडी, ब्राह्मणपुरी मंडळ - खेडदिगर मुख्यालय अंतर्गत रायखेड, बिलाडी, गणोर मुख्यालय अंतर्गत, खरगोन, तवळाई, आडगाव, मुबारकपूर, कलसाडी मंडळ- वैजाली मुख्यालय अंतर्गत करणखेडा,

काथर्धे दिगर मुख्यालय अंतर्गत नांदर्डे, प्रकाशा मंडळ- प्रकाशा, लांबोळा मुख्यालय अंतर्गत मनरद, नांदरखेडा मुख्यालय अंतर्गत-पळासवाडा, वढे, सारंगखेडा मंडळ - कळंबू, वडाळी मंडळ - वडाळी, फेस मुख्यालय अंतर्गत, दोंदवाडे प्रमाणे रिक्त आहेत. तालुक्यातील एकूण रिक्त कोतवाल - ३०, कार्यरत ३४, तर एकूण मंजूर पदे ६४ आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT