Paddy Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Variety : कोकणवासीयांसाठी भाताचे ‘कोकण सुहास’ वाण विकसित

Konkan Suhas : कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव भात कृषी संशोधन केंद्राने सुपर बासमती या भात वाणावर गॅमा किरणांची प्रक्रिया करून नवीन सुवासिक ‘कोकण सुहास’ भाताचे वाण विकसित केले आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव भात कृषी संशोधन केंद्राने सुपर बासमती या भात वाणावर गॅमा किरणांची प्रक्रिया करून नवीन सुवासिक ‘कोकण सुहास’ भाताचे वाण विकसित केले आहे. या वाणाला अकोला येथे झालेल्या ५२ व्या संयुक्त कृषी समितीत मान्यता मिळाली आहे. पुढील हंगामात हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असे संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले.

शिरगाव केंद्राने आतापर्यंत भात पिकामध्ये एक संकरित वाण सह्याद्री ५ आणि १२ विकसित करून प्रसारित केले आहे. त्यामध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४, रत्नागिरी-५, रत्नागिरी-६, रत्नागिरी-७ व रत्नागिरी-८ या जाती प्रामुख्याने खूपच लोकप्रिय आहेत.

शेतकऱ्यांकडून बासमती भात वाणाची सर्वाधिक विचारणा केंद्राकडे करत आहेत. कोकणात खरीप हंगामात भात फुलोऱ्याच्या वेळी तापमानात वाढ होते. त्यामुळे सुवासिक वाणाची कोकणामध्ये लागवड केली तर त्याला अपेक्षित वास येत नाही.

भाताचा वास हा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार व तापमान या दोन मुख्य घटकांवर अवलंबून आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिरगाव कृषी संशोधन केंद्राने सुपर बासमती या भात जातीच्या बियाण्यांवर प्रक्रिया करून नवीन सुवासिक वाण निर्माण केले आहे. या वाणाला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतून ‘कोकण सुवास’ नावाने मान्यता देण्यात आली आहे. ही जात विकसित करण्यामध्ये डॉ. भरत वाघमोडे, डॉ. विजय दळवी, डॉ. संजय भावे आणि डॉ. नीलेश सोनोने या शास्त्रज्ञांचा मोलाचा सहभाग आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

‘कोकण सुहास’ ही जात हळवी (११५-१२० दिवस) असून ११०-११५ सेंमी ऊंच वाढते. या जातीचा तांदूळ अति बारीक व लांबट (बासमतीसारखा) असून सुवासिक आहे. त्याचे उत्पन्न सरासरी ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर मिळते. काही शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे प्रयोग केल्यावर तांदळाची प्रत चांगली असल्याचे निष्कर्ष दिलेले आहेत. पुढील हंगामामध्ये या जातीचे बियाणे शिरगाव कृषी संशोधन केंद्र, या ठिकाणी उपलब्ध होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT