Paddy Nursery : भात पट्ट्यात ३,२४० हेक्टरवर रोपवाटिका

Kharif Season : गेल्या आठ दिवसांपासून जोरदर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.
Paddy Nursery
Paddy NurseryAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या आठ दिवसांपासून जोरदर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. भात पट्ट्यात आत्तापर्यंत ३,२४० हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या असून, येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास रोपवाटिका करण्यासाठी आणखी वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत .

पावसाचे जवळपास १४ दिवस झाले आहे, त्या काळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे मशागतींच्या कामाला वेग आला आहे. सध्या परिसरात ट्रॅक्टर मालकांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे मात्र काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बैल जोडीच्या साहाय्याने मशागत करण्यास पसंती दिल्याचे चित्र भात पट्ट्यात पाहायला मिळते.

मात्र, बैलजोडीने वेळ जास्त लागत असला तरी काही ठिकाणी बैलानेच पेरणी व मशागतीच्या कामावर भर दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेत तयार करून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापूर्वी काही ठिकाणी भात रोपवाटिका टाकण्यास सुरुवात केली आहे.

Paddy Nursery
Kharif Season : बियाणे, खतांची साठेबाजी होत असल्यास करा व्हॉट्‍सॲप

पुणे जिल्ह्यात खरिपाची एक लाख ९५ हजार ७१० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी भाताची ६० हजार २०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.

यंदा कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठाचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना केला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे. पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे.

Paddy Nursery
Kharif Season : राज्यात सोमवारपासून कृषी संजीवनी पंधरवडा

त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यातील भात रोपवाटिकेचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका --- रोपवाटिकेचे क्षेत्र

भोर -- ५६०

वेल्हे -- ३५५

मुळशी -- ५४८

मावळ -- ६२०

हवेली -- ९०

खेड -- ५२८

आंबेगाव -- २८४

जुन्नर -- २१०

पुरंदर -- ४५

एकूण -- ३२४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com