Kolhapur Rain
Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडामध्ये मुसळधार, राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत १ फुटाने वाढ

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर इतर तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणातील ८.३६ टीएमसीपैकी २.६५ टीएमसी धरण भरले असून, धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे, तर शिंगणापूरसह ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीसह पंचगंगा नदीची पाणी पातळीही वाढत आहे. रात्री आठ वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाराची १९ फूट ३ इंच पाणी पातळी राहिली. काल (ता.०१) सकाळी सात वाजल्यापासून धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- यवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव असे ९ बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम, शिंगणापूर आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच बॅरिकेड्‌स‌ लावून या बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील स्थिती टीएमसीमध्ये

राधानगरी २.६५, तुळशी १.३५, वारणा १२.१९, दूधगंगा ४.७३, कासारी ०.९५, कडवी १.२९, कुंभी ०.९२, पाटगाव १.६७, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५९, जंगमहट्टी ०.५१, घटप्रभा १.५५, जांबरे ०.५९, आंबेआहोळ ०.८९, सर्फनाला ०.०६ व कोदे लघु प्रकल्प ०.१० टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात

राजाराम १९.३, सुर्वे २०.४, रुई ४६.३, इचलकरंजी ४४.९, तेरवाड ४१.६, शिरोळ ३१.६, नृसिंहवाडी २५, राजापूर १४.९ फूट तर नजीकच्या सांगली ८.३ फूट व अंकली ८.१० फूट अशी आहे.

कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून यंदा प्रथमच कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले. जूनमध्ये पावसाची उघडझाप राहिली. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. या परिसरात रविवारी व सोमवारी पावसाची संततधार सुरु होती. परिणामी ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कासारीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठावरील सखल भागातील ऊस तसेच गवताची कुरणे पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी जाळे लावून मासेमारी सुरु केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT