Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

Ravikant Tupkar on Raju Shetti : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी थेट राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर संघर्ष पेटला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात आरोप -प्रत्यारोप पहायला मिळाले होते. तर राजू शेट्टी यांना न जुमानता तुपकर यांनी लोकसभेवेळी अपक्ष निवडणूक लढवली होती. तुपकरांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी अडीच लाखांवर मते घेतली होती. तर शेट्टींचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर आता तुपकर यांनी शनिवारी (ता.६) शेट्टी यांच्यावर घणाघाती हल्लाबोल करताना टीका केली आहे. तसेच काय कारवाई करायची ती खुशाल करा असे आव्हानच दिले आहे. तर तुपकर यांनी पुढील राजकीय घोषणा देखील केली आहे. त्यामुळे तुपकर आता संघटनेतून बाहेर पडतील असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तुपकर यांनी शनिवारी आपल्या पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. तसेच आता थांबायचे नाही, विधानसभा लढवायचीच असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तर बुलढाण्यातील सहाही मतदारसंघात उमेदवार देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना तुपकर यांनी केल्या आहेत.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : 'मी अपक्ष नाही, ...तर शेतकऱ्यांचा उमेदवार'!; तुपकर आज अर्ज दाखल करणार

तुपकरांची खोचक टीका

यावेळी तुपकर यांनी शेट्टी यांना आव्हान दिले असून आपल्याला काय समिती नेमायची आहे ती नेमा. निवडणुकीत पक्षापेक्षाही अधिक मते अपक्ष म्हणून मते मिळवली असल्याची खोचक टीका शेट्टी यांच्यावर तुपकर यांनी केली आहे. तसेच उठं सुट मला नोटिसा पाठवल्या जातात. पुण्यात हजर व्हा असे म्हटले जाते. मी काय दरोडा टाकला आहे का? अशी विचारणा तुपकर यांनी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांसह शेट्टी यांना केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट

यावेळी तुपकरांनी सांगितले की, आपल्याला विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी मेहकर, सिंदखेडराजा, चिखली आणि बुलढाणा मतदारसंघात चाचपणी करावी असाही आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. तर श्याम अवथाळे यांनी आता तुपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा विचार करावा असे सुचवले. यावेळी तुपकर म्हणाले, आपली लढाई विस्थापितांच्या विरोधात आहे. आपल्याला आपल्या चुका दुरूस्त करून पुढे जावं लागेल. त्यामुळे या बैठकीचे आयोजन आहे. तर कार्यकर्त्यांच्या जीवावर इथ पर्यंत आपण आलो असल्याचे तुपकर म्हणाले.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : 'त्यांनी स्वत:साठी तडजोड केली, पण मी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अपक्ष लढणार'; तुपकरांचा एल्गार

तर ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार आणि ज्यांनी मतदान नाही केले त्यांच्याबद्दल आपल्या मनात कोणताच राग नाही. पण आपण निवडणुकीत उभारलो आणि रंगत आली. पक्ष, पैसा आणि पुढारीच विरोधात असतानाही सामान्य जनतेनं निवडणूक हाती घेतली त्यामुळेच अडीच लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली. त्यामुळे अनेक पुढाऱ्यांना तोंडात बोटं घालावी लागल्याचा टोला तुपकर यांनी लगावला.

तर आणखी जरा जोर लावला असता तर आपला विजय झाला असता. त्यामुळे पडलो म्हणून निराश न होता पुढे जायचं असल्याचे तुपकर म्हणाले. आपल्याला ज्यांचा विरोध होता त्यांच्याच गावात लीड मिळालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरी ताकद काय आहे हे नेत्यांना कळली आहे. त्यामुळे या पुढे सगळे एकत्र येऊन, सगळ्यांना विचारात घेऊन पुढे जाऊ असेही तुपकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com