Kolhapur Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Committee Election : कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीत सत्तारूढ आघाडीतील विद्यमान संचालकांना वगळले

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur Election News : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Kolhapur Market Committee Election) सत्तारूढ राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात एकाही विद्यमान संचालकाला स्थान मिळालेले नाही;

तर समितीचे माजी सभापती पैलवान संभाजी पाटील, अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांना पॅनेलमध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भारतीय जनता पक्षालाही संधी देण्याचे प्रयत्न ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या माध्यमातून सुरू होते.

पण बुधवार जाहीर केलेल्या यादीत भाजपला वगळून पॅनेल केल्याचे स्पष्ट झाले. यावर भाजपची भूमिका काय असणार, हे स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीवर यापूर्वी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील वगळता दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता होती. या वेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला संधी देण्याबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेत्यांच्या बैठका सुरू होत्या.

मंगळवारी (ता. १८) रात्री झालेल्या चर्चेनंतर पक्षनिहाय कोणाला किती जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यात राष्ट्रवादीला सहा, काँग्रेसला व जनसुराज्यला प्रत्येकी तीन, शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांना प्रत्येकी एक तर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांना एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे नेत्यांनी दिलेल्या नावांच्या उमेदवारांची घोषणा पॅनेलचे समन्वयक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी गुरुवारी (ता. २०) जाहीर केली.

‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.

निश्चित झालेल्या उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित उमेदवारांनी माघार घेऊन या पॅनेलला पाठबळ द्यावे आणि सहकार्य करावे’, असे आवाहन पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT