Animal Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination : शिरोळ तालुक्यात ४० हजार जनावरांना लसीकरण

Animal Care : महापुराचा तालुक्यातील पशुधनावर विपरीत परिणाम झाल्यानंतर दुग्धोत्पादनातही तालुका पिछडीवर गेल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारी केली आहे. तालुक्यातील ४० हजार जनावरांसह शेळी, मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. महापुराचा तालुक्यातील पशुधनावर विपरीत परिणाम झाल्यानंतर दुग्धोत्पादनातही तालुका पिछडीवर गेल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाचे लसीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २००५पासून शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसत आहे. या आधीच्या काळात तालुक्यात पशुधनाची संख्या लाखांवर होती. मात्र सततच्या महापुरामुळे जनावरे भेकड बनू लागल्याने शिवाय चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागल्यामुळे पशुपालनाकडे दुर्लक्ष होत गेले.

एकेकाळी शिरोळ तालुका दुग्धोत्पादनात जिल्ह्यात पहिल्या तीन क्रमांकात होता. मात्र महापुराच्या सततच्या फटक्यामुळे तालुक्यातील पशुपालनावर याचा मोठा परिणाम झाल्याने तालुका मागे गेला आहे. यामुळे वर्षाकाठी कोट्यवधी रुपयाचे नुकसान पशुपालकांना सोसावे लागत आहे. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभाग सावध झाला आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जवळपास ४० हजार जनावरांचे लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.

तालुक्यातील अर्जुनवाड, निमशिरगाव, नांदणी, सैनिक टाकळी, कुरुंदवाड, शिरोळ, दत्तवाड, अब्दुललाट, हसुर, कोथळी, राजापूर, शिरढोण, हेरवाड, शेडशाळ, उदगाव, दानोळी, जांभळी, चिपरी, यड्राव या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.

खरीप हंगाम तोंडावर असून जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अकरा हजार किलो मका बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील महापुराचा धडा घेऊन पशुसंवर्धन विभागाकडून चांगल्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

लसीकरण झालेली जनावरे

म्हैस ८,८००

गाय २० हजार

शेळी, मेंढी १२ हजार

पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त

शिरोळ तालुक्यात शासनाचे सोळा तर जिल्हा परिषदेचे सहा दवाखाने आहेत. यातील शासनाच्या श्रेणी दोनमधील दहा दवाखान्यांपैकी सहा दवाखान्यांमध्ये पशू वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने याचा पशुपालकांना फटका देखील बसत आहे.

आठ पथके

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आठ पथके तयार करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरण पूर्ण झाले असून पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT