Shaktipith Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्‍तिपीठ’मधून कोल्हापूरला वगळले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipeeth Highway : शक्‍तिपीठ महामार्गातून कोल्हापूर वगळल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता.२२) येथे शक्‍तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. उलट, शक्‍तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शिष्टमंडळाने केला.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. शिष्टमंडळाने त्यांची विमानतळ येथे भेट घेत शक्‍तिपीठ महामार्गाबद्दल जाब विचारला. माजी आमदार संजय घाटगे व समन्वयक गिरीश फोंडे यांनी नेतृत्त्व केले.

फोंडे यांनी महामार्गाबद्दल आम्हाला स्थगिती व फेररचना नको, तर हा महामार्गच रद्द करण्याचा अध्यादेश काढावा, अशी मागणी केली. नागपूर ते रत्नागिरी व सांगली ते नांदेड महामार्ग असे दोन पर्यायी मार्ग असताना शक्‍तिपीठ महामार्गाची गरज नाही, असेही स्पष्ट केले.

घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तीव्र असून, महामार्ग रद्द केल्याचे लेखी जाहीर करावे, असे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याचे स्पष्ट केले. शिष्टमंडळाने महामार्गच रद्द करण्याच्या भूमिकेवर जोर दिला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळ संभाजीनगर बसस्थानकाकडे आले. येथे सकाळी अकरा वाजता शेतकरी व महिला आंदोलक जमल्या होत्या. दुपारी तीनपर्यंत ते येथे थांबून होते. त्यांना फोंडे, शिवाजी मगदूम व आनंदा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घडलेला वृत्तांत सांगितला. आंदोलनाची पुढची दिशा लवकरच बैठक घेऊन जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी सम्राट मोरे, विक्रांत पाटील, एम. पी. पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुधाकर पाटील, पूजा मोरे, योगेश कुळमोवडे, युवराज पाटील, तानाजी भोसले, संजय कदम, दादासाहेब पाटील, युवराज कोईगडे, नितीन मगदूम, शुभांगी मगदूम, साताप्पा लोंढे, पांडुरंग पाटील, अमृता मोरे, संग्राम वडणगेकर उपस्थित होते.

महामार्ग विरोधात घोषणा

दरम्यान, समितीने तपोवन मैदान परिसरात शक्‍तिपीठ महामार्ग रद्द करा, त्रिदेव लाडका कंत्राटदार योजना, शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT