Monsoon Rain Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain Kolhapur : पावसाचं आगार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला मॉन्सूनची अद्याप प्रतिक्षाच

Kolhapur Monsoon Rain : कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात मात्र मॉन्सूनच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपूर्वी वळवाच्या पावसाने जोरदार झोडपलं यानंतर अचानक हवामानात बदल झाल्याने मॉन्सूनचा पाऊस दमदार आगमन करेल अशी प्रतिक्षा असताना मात्र पाऊस गायब झाला आहे. ५ जून नंतर जिल्ह्यात एकदाही दमदार सरी कोसळल्या नाहीत, फक्त ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान मागच्या २४ तासांत काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. परंतु धुळवाफ पेरणी केलेल्या शेतकऱ्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात मात्र मॉन्सूनच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्याला कोकण किनारपट्टी असल्याने पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात जून निम्मा झाला, तरी अद्याप दमदार पाऊस नाही. तुलनेत आज (ता.१३) काही ठिकाणी सकाळी ऊन- पावसाचा खेळ झाला, परंतु धुव्वाधार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर पाऊस होताना दिसत नाही, अजूनही वळीव पावसासारखाच पाऊस होत आहे. पडेल त्या ठिकाणीच पाऊस, असेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. मागच्या आठ दिवसात दिवसभर खडखडीत ऊन पहायला मिळत आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली, मिरज, पंढरपूर या भागात धुवांधार पाऊस सुरू आहे, पण कोल्हापूरला पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस नाहीच

मागच्या चार दिवसांत जिल्ह्यातील महत्वाची धरणे असणाऱ्या राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगासह सर्वच धरणक्षेत्रात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांनी तळ गाठल्याने तेथील पावसाकडे सर्वाच्या नजरा आहेत. यंदा पाऊस चांगला होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

शिरोळमध्ये १४.९ मिलीमीटर पाऊस

सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.३ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १४.९ मिलीमीटर पावसाची शिरोळ तालुक्यात नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices : कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय

CM Annapurna Yojana: घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी ३ मोफत गॅस सिलिंडर; महिलांसाठी राज्य सरकारची योजना

Kashmir Fruit Crisis: काश्मीरच्या फळ उत्पादकांचे मोठे नुकसान; जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

Grass Selling: गवताच्या भाऱ्याचा आधार

Agrowon Podcast: आल्याच्या दरातील तेजी टिकून; कापसाचे भाव दबावातच, सोयाबीनचे दर स्थिरावले, लाल मिरचीची आवक मर्यादीत तर शेवग्याला चांगला उठाव

SCROLL FOR NEXT