Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : पंचगंगा नदीसह राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, पेरण्यांना गती

Rain Update Kolhapur : उन्हाचा तडाखा वाढल्याने माळरानातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाने पिकांना उभारी मिळाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात गायब झालेल्या पावसाने रिमझिम सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्ति इतर ठिकाणी पावसाने चांगली साथ दिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी इंच-इंच वाढू लागली आहे. कसबा बावडा बंधारा येथे सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी १३ फूट २ इंचांपर्यंत गेली आहे. दरम्यान, जिरवणीच्या या पावसामुळे खरिपाच्या पिकांना बुस्टर मिळत आहे. तर माळरानावरील पेरण्यांना गती आली आहे. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड या घाट माथ्यांवरील तालुक्यांत जोरदार पावसाने झोडपले, तर करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यांत दिवसभर कधी जोरदार, तर कधी हलक्या स्वरूपाच्या पावसाने दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून अधून-मधून होणाऱ्या पावसानेही पाठ फिरवली होती. यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने माळरानातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाने पिकांना उभारी मिळाली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. काल सकाळपासून आतापर्यंत दोन फूट पाणी पातळी वाढली आहे. सध्या होणारा पाऊस हा पिकांना पोषक आहे. ऊस वाढीसाठी याच पावसाची निश्‍चितपणे मदत होणार आहे

पावसाचा नूर पाहून शेतकऱ्यांनी उगवण झालेल्या भात, भुईमूग, सोयाबीन पिकांना खतांचा डोस दिला जात आहे. फळभाज्यांना खोड अळी लागू नये यासाठी कीटकनाशकांची फवारणीही केली जात आहे. जिल्ह्यात मॉन्सूनला पोषक वातावरण झाले असून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी

होत असलेल्या पावसामुळे धान्य व कडधान्यांच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर येजा सुरू होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांकडून चांगल्या आणि दर्जेदार बियाण्यांची खरेदी होत आहे. दरम्यान, बियाण्यांमधून फसवणूक किंवा बोगस बियाणे दिले जाऊ नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी सेवा केंद्रांना सक्त सूचना दिल्या आहेत.

धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे टीएमसीमध्ये

राधानगरी २.३६, तुळशी १.३०, वारणा ११,१३, दूधगंगा ३.८९, कासारी ०.७८, कडवी १.२३, कुंभी ०.८७, पाटगाव १.४२, चिकोत्रा ०.५०, चित्री ०.५२, जंगमहट्टी ०.४५, घटप्रभा १.१८, जांबरे ०.४३, आंबेआहोळ ०.८९ व कोदे लघु प्रकल्प ०.०५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे (फूट). राजाराम १४.३, सुर्वे १७.११, रुई ४१, तेरवाड ३६.६, शिरोळ २७, नृसिंहवाडी २१.६, राजापूर १२ फूट तर नजीकच्या सांगली ७.३ व अंकली ५.४ अशी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Crop Damage: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अवकळा

Electricity Bill Dues Issue: थकबाकीदार कार्यालयांवर महावितरणची कारवाई

Nashik Crop Damage: अवकाळीचा ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Honey Village Scheme: मधाच्या गावांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ai in Agriculture: बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

SCROLL FOR NEXT