Sorghum Production agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Production : कोल्हापूर जिल्ह्यात भाकरीची चिंता मिटली, ज्वारीच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

Sorghum Production : ऊस पिकाऐवजी ज्वारीचे पीक घेण्याचे आवाहन केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे भरघोस उत्पादन झाले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sorghum Production : मागच्या वर्षी झालेल्या कमी पावसाने खरिप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान रबी हंगामात याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले होते. ऊस पिकाऐवजी ज्वारीचे पीक घेण्याचे आवाहन केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे भरघोस उत्पादन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वैरणीबरोबर ज्वारी पीक हातात आल्याने शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

राधानगरी आणि काळम्मावाडी या दोन प्रमुख धरणाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात अन्य धरणामध्ये पुरेस पाणी असल्याने जिल्हा प्रशासन डिसेंबरपासूनच काळजी घेत आहे. अशातच काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी धरणात अपुरा साठा ठेवला जाणार असल्याने पाटबंधारे विभागाने केलेल्या आवाहनानुसार अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणीला फाटा देऊन ज्वारीचे उत्पादन घेतले.

याचबरोबर ज्वारीचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. ज्वारीच्या कडब्याचा जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यामुळे कडब्याच्या पेंडीचा दर २५ ते ३० रुपये झाला आहे. सध्या ज्वारीचे उत्पादन सरासरी एकरी सात ते दहा क्विंटल आहे, तर जिराईत शेतीत पाच ते सहा क्विंटल आहे. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या वाणाची निवड केली आहे. यामध्ये अपर्णा, सुवर्णा, मालदांडी यांसह सुधारित जातींचा समावेश आहे.

जिल्ह्यात यावर्षी रब्बीचे क्षेत्र ११ हजार ८५४ हेक्टर आहे. यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ हजार ७०० हेक्टर असून, यामध्ये ११ हजार ८५४ हेक्टर ज्वारी, गहू १६५९ हेक्टर, मका १२९३ हेक्टर, इतर तृणधान्ये १५० हेक्टर, हरभरा ४७७३ हेक्टर, इतर कडधान्ये ११३६ हेक्टर, तीळ ३९ हेक्टर व गळीत धान्य १०३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

सध्या ज्वारीची ६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. गहू, हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आहे. जवळपास रब्बी हंगामातील ६० ते ७० टक्के पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामापाठोपाठ उन्हाळी हंगामातही आतापर्यंत उन्हाळी भाताची १६० हेक्टर, मका पिकाची ७९५ हेक्टर व उन्हाळी भुईमूग ६९२ हेक्टरवर पेरणी झाली असून, उगवण समाधानकारक आहे.

पाटबंधारे विभागाने ऊस लावण न करण्याबाबत आवाहन केल्याने 66 बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी हमखास उत्पादन मिळवून देणारे ज्वारीचे पीक निवडले आहे. भात कापणीनंतर ज्या शेतकऱ्यांनी लगेच ज्वारी पीक घेतले, त्यांनी पीक पोटरीला आल्यानंतर सरासरी १२०० रुपये प्रतिगुंठा कडबा विकून त्याच क्षेत्रात ऊस पीक घेऊन दुहेरी उत्पन्नाचा फायदा घेतला आहे. एकंदरीत उसापेक्षा हमखास पैसे मिळवून देणाऱ्या ज्वारी पिकाची निवड फायद्याची ठरली आहे.

- सुनील डवरी, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, भुदरगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Project: इथेनॉल प्रकल्प चालणार कसे?

Maharashtra Grape Growers Association: नवे वाण, मातीचे आरोग्य, नव्या तंत्राचे महत्त्व झाले अधोरेखित

Strawberry Farming: आदिवासींच्या शेतात वाढणार स्ट्रॉबेरीची लाली

El Nino & Global Food Security: ‘एल निनो’ आणि जागतिक अन्नसुरक्षा

Bhimashankar Tourism: सह्याद्रीत बहरले निसर्गाचे वैभव

SCROLL FOR NEXT