KDCC Bank agrowon
ॲग्रो विशेष

KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँक देणार क्यूआरकोड, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

Hasan Mushrif : पीक कर्जाचा व्याजदर १२ टक्क्यांवरून सात टक्के एवढा कमी केला असून भूमीहिन शेतकऱ्यांना खावटी कर्ज दिल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

sandeep Shirguppe

KDCC Bank Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या दारात जाणार आहे. बँकेच्या वतीने 'क्यूआर कोड स्टॅन्डसह साउंड बॉक्स' सुविधा देणार आहे. या माध्यमातून व्यापारी बँकेशी व्यवहार करणार आहेत. दोन महिन्यांत एक लाख ग्राहकांपर्यंत क्यूआर कोड पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पालकमंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेच्या संचालक मंडळात निर्णय झाला.

शहरासह तालुक्याची गावे, मोठ्या बाजारपेठा, मोठी गावे व इतर ठिकाणचे व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांकडे जाण्यासाठी बँकेने क्यूआर कोडची मोहीम हाती घेतली आहे. दैनंदिन व्यापातून दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक व व्यापाऱ्यांना बँकेकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बँक त्यांच्या दारात जाणार आहे. यातून बँकेचा व्यवहार वाढविणार आहे.

'पाच वर्षांत कर्मचाऱ्यांना नियमित बोनससह एक पगार जादा बोनस दिला. तसेच पीक कर्जाचा व्याजदर १२ टक्क्यांवरून सात टक्के एवढा कमी केला असून भूमीहिन शेतकऱ्यांना खावटी कर्ज दिल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंह गायकवाड, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, स्मिता गवळी आदी संचालक, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

क्यूआर कोड'ची जोडणी विनाशुल्क

क्यूआर कोड'ची जोडणी विनाशुल्क 'क्यूआर कोड'ची जोडणी सेवा ग्राहकांना विनाशुल्क दिली जाणार आहे. क्यूआर कोडच्या व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकाला बँकेकडे त्याच्या इच्छेनुसार पिग्मी ठेवता येईल. क्यूआर कोडच्या माध्यमातून मानवरहीत स्वयंचलित पिग्मी सुविधा ग्राहकांना दिली जाणार आहे. या पिग्मीवर ग्राहकांना अत्यल्प व्याजदराचे कर्जही दिले जाणार आहे.

पी. एन. पाटील यांना आदरांजली

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. 'पी. एन. पाटील ४० वर्षे बँकेचे संचालक होते. संचालक मंडळाच्या बहुतांश बैठकांना ते उपस्थित असायचे,' असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळीआधी दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये एकत्र मिळणार का?

Agriculture Water Crisis: परभणी जिल्ह्यातील सहा लघू सिंचन तलाव कोरडे; पाणीटंचाईचे संकट गडद

Water Supply Demand: वैजापूरमध्ये पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा; सहा आवर्तनांची मागणी

Rahul Gandhi: राहुल गांधींना मोठा दिलासा, अमित शहांच्या मानहानी प्रकरणात निर्दोष सुटका

Citrus Orchard Management: अवर्षणात लिंबूवर्गीय फळबागांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT