Agriculture Water agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Water : शेतीसाठी विजेचा वापर वाढला, कडक उन्हामुळे ८ दिवसात दोन वेळा पाणी देण्याची वेळ

Kolhapur Electricity : कोल्हापूर जिल्ह्यात ३०० मेगावॅट विजेची जादा मागणी वाढली आहे. सध्या रोज ११०२ मेगावॅट वीज लागत आहे.

sandeep Shirguppe

Electricity Consumption Agriculture : कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरदार वाढला आहे. दरम्यान उन्हाच्या कडाक्याने विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ३०० मेगावॅट विजेची जादा मागणी वाढली आहे. सध्या रोज ११०२ मेगावॅट वीज लागत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १ हजार ६१ मेगावॅट वीज लागत होती.

यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिक विजेचा वापर वाढला आहे. वीज वापरात सर्वाधिक वाढ शेतीमध्ये झाली आहे. रोज सरासरी ६४८ मेगावॅट विजेचा वापर शेतीपंपासाठी होत आहे. उन्हाळा तीव्र झाल्याने पिके वाळत आहेत. गारवा मिळण्यासाठी फॅनची अखंड गरगर सुरू आहे. एसी, कूलर सुरू आहेत. यासाठी भरमसाठ विजेची मागणी वाढली आहे.

परिणामी, मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत पडल्याने वीजपुरवठा करताना वीज प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याला इतरवेळी सरासरी ७५० मेगावॅट वीज लागते. पावसाळ्यात सहाशे मेगावॅट इतकी विजेची मागणी कमी होते.

वर्षात सर्वाधिक विजेची मागणी उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात लागते. यावर्षी अलीकडच्या काही वर्षांतील उष्णतेचा आलेख वर गेल्याने सध्या विजेची मागणीही गेल्या वर्षापेक्षा ११० ते १५० मेगावॅट विजेची मागणी अधिक होत आहे. वळीव न झाल्याने ऊस वाळत आहे.

यामुळे शेतकरी वीज असेल त्यावेळी विद्युत पंप सुरू करीत आहे. यामुळे ६४८ मेगावॅटपर्यंत विजेची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४४१ मेगावॅट वीज लागत होती. गेल्या वर्षापेक्षा विजेचा वापर वाढला आहे.

वळीव पावसाची प्रतीक्षा

दुपारी प्रचंड उष्मा वाढत असल्याने मनुष्यासह प्राणीही गारवा शोधत आहेत. जोरदार वळीव पडल्यानंतर उष्मा कमी होऊन गारवा निर्माण होतो. त्यामुळे सर्वच वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले

Electricity Theft : मराठवाड्यात ११८६ मीटरमध्ये वीज चोरी

Soil Pollution : प्रदूषित माती उपजाऊ करताना...

Coconut Intercropping : नारळ बागेत आंतर पीकपद्धती फायदेशीर

Farmers Loss: स्वामिनाथन आयोगाचा एमएसपी फॉर्म्युला लागू न केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, ३ लाख कोटींचे नुकसान

SCROLL FOR NEXT