Congress MLA P N Patil agrowon
ॲग्रो विशेष

Congress MLA P N Patil : काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा हरपला

Kolhapur Congress : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा म्हणून ओळख असलेल्या आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाले.

sandeep Shirguppe

Congress Leader P N Patil : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा म्हणून ओळख असलेल्या आमदार पी. एन. पाटील यांचे आज(ता.२३) सकाळी पहाटे निधन झाले. ७१ वर्षांच्या पी.एन. पाटील यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी खडतर प्रवास केला होता.

१९ मे रोजी सकाळी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पी.एन पाटील यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आमदार आणि कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी फेबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो."

कर्तव्यनिष्ठ लोकसेवक

करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक असून एक निष्ठावंत आणि कर्तव्यनिष्ठ लोकसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचा आधारवड गेला

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे जेष्ठ सहकारी आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. श्री.पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार पी.एन पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता सडोली खालसा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ठेवणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT