Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : किसन वीर साखर कारखान्याची ऊसबिले मिळणार कधी?

Kisan Veer Sugar Factory : जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र व ५० हजारहून अधिक सभासद असलेल्या भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने १५ डिसेंबरनंतर एकही ऊसबिल काढले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Satara News : भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याने १५ डिसेंबरनंतर गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप काढली नसून, ती लवकरात लवकर काढून शेतकऱ्यांचा पाडवा गोड करावा, अशी मागणी शिवसेनेच्या सातारा-जावळी विधानसभा प्रमुख प्रशांत तरडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र व ५० हजारहून अधिक सभासद असलेल्या भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने १५ डिसेंबरनंतर एकही ऊसबिल काढले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

नियमानुसार गाळप झालेल्या उसाचे १४ दिवसांत एफआरपी कायद्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे गरजेचे असतानादेखील कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस उसाचे पैसे दिले नाहीत. सध्या आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बॅंका, सोसायट्या कर्जे फेडण्यासाठी तगादा लावला आहे.

तसेच ३१ मार्चअखेर जर शेतकरी सभासदांकडून त्याच्या पीक कर्जाचे नूतनीकरण झाले नाही, तर शेतकरी अजून अडचणीत येईल. मध्यंतरी कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळातील सदस्यांनी सभासद शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासन दिली होती.

त्यापूर्वी कारखाना अडचणीत असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून या कारखान्यास सुमारे ५०० कोटींचे थकहमी दिली होती, तरीही शेतकऱ्यांची ऊसबिले न दिल्याने शेतकरीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर सध्या कर्जाचा डोंगर असून, कारखान्याने तातडीने हालचाल करून मार्चअखेर बिले जमा करावीत, अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT