Water Resources Department Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : भूसंपादन मावेजासह अन्य मागण्यांसाठी ‘किसान संघ’ आक्रमक

Farmer Demands : शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आक्रमक झालेल्या भारतीय किसान संघ व शेतकऱ्यांमुळे जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत मागण्या निकाली काढण्याचे लेखी दिले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आक्रमक झालेल्या भारतीय किसान संघ व शेतकऱ्यांमुळे जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत मागण्या निकाली काढण्याचे लेखी दिले. त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती भारतीय किसान संघाकडून देण्यात आली.

येथील मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभाग (कडा) या कार्यालयासमोर बुधवारी (ता. २६) बीड जिल्हा येथील शेतकऱ्यांचे भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भात भारतीय किसान संघाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ढालेगाव (ता. गेवराई) येथील शेतकऱ्याचा १८/२८ खाली भूसंपादन मावेजाचा निवाडा होऊन कित्येक वर्षे झाली.

परंतु संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना पेमेंट करीत नाहीत. आतापर्यंत संबंधित कार्यालयात शेतकऱ्यांनी अनेक वेळेस चकरा मारल्या. वरिष्ठ कार्यालयाची आज्ञा खालचे अधिकारी पाळत नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तसेच पुरुषोत्तमपुरी येथील शिवारातून पैठण उजवा कालव्याची ७० चारीची मायन ७ व तिची उप चारी-एफ जाते. अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून चारीचा सर्विस रोड व चारी ताब्यात घेऊन वहिती केली आहे.

त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना रस्त्याच्या अडचणीमुळे शेती वहिवाट करण्यास अडचणी येत आहेत. तसेच लाभ क्षेत्रातील शेतकरी पैठण उजव्या कालव्याचे पाणी मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. मायनर ७ व सब मायनर-एफ चा सर्विस रोड अतिशय खराब झालेला आहे. त्यावर मुरूम टाकून रस्ता वाहतूक योग्य करावा अशी कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु संबंधित अधिकारी काहीच करत नाहीत.

म्हणून नाइलाजाने भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले होते. धरणे सुरू असताना प्रादेशिक कार्यालयात मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये विषयांच्या अनुषंगाने चर्चा होऊन जायकवाडी प्रकल्प टप्पा २ (पीआरबीसी) भूसंपादन प्रकरणे करिता, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ३. बीड व कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र. १०, परभणी यांना १५ जुलै २०२४ पर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तसेच पैठण उजवा कालवा चारी क्र. ७० मायनर ७ वरील उपचारी एफ अतिक्रमण काढणे व सेवा पथाची दुरुस्ती यांत्रिकी विभागामार्फत करण्यात यावी या करिता कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ३. बीड यांना ७ जुलै २०२४ पर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सायंकाळी लेखी स्पष्ट करण्यात आले. सोबतच सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. दिलेल्या लेखी आश्‍वासनामुळे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात, आल्याची माहिती भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष बळीराम सोळंके यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT