Agriculture Advisory  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला ः राहुरी विभाग

Soybean Sowing : सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.

Team Agrowon

सोयाबीन पेरणी

पेरणीचे अंतर : ५ × ४५ सेंमी

खत मात्रा : चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १२ ते १५ टन वापरावे. सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत अथवा दोन चाड्यांच्या पाभरीने खते व बियाणे एकाचवेळी पेरून द्यावे.

तूर पेरणी

पेरणीचे अंतर : ६० × २० सेंमी किंवा ९० × २० सेंमी

खत मात्रा : सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणीचे वेळी द्यावे. पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची (मल्टी न्यूट्रियन्ट) फवारणी करावी. आंतरपीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या मुख्य पिकाची शिफारस केलेली खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीनकरिता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.

मूग पेरणी

पेरणीचे अंतर : ३० × १० सेंमी

खत मात्रा : २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणांलगत पेरून द्यावी म्हणजे त्याचे चांगले परिणाम मिळतात.

उडीद पेरणी

पेरणीचे अंतर : ३० × १० सेंमी

खत मात्रा : २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणांलगत पेरून द्यावी म्हणजे त्याचे चांगले परिणाम मिळतात.

कापूस पेरणी

पेरणीचे अंतर :

बी.टी. कापूस कोरडवाहू लागवड – १२० × ४५ सेंमी (४ × १.५ फूट)

बी.टी. कापूस बागायती लागवड – १५० × ३० सेंमी (५ × १ फूट) किंवा १८० × ३० सेंमी (६ × १ फूट)

खत मात्रा : संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाशची मात्रा आवश्यक असते. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रति हेक्टरी २५ गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे.

मका पेरणी

पेरणीचे अंतर : उशिरा व मध्यम वाणांसाठी ७५ × २० सेंमी

लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी ६० × २० सेंमी

खत मात्रा : पेरणीच्या वेळेस ३५ किलो युरिया, १५० किलो स्फुरद आणि २८ किलो पालाश प्रति एकरी द्यावे.

सूर्यफूल पेरणी

पेरणीचे अंतर :

मध्यम ते खोल जमिनीत व सुधारीत वाणांसाठी ४५ × ३० सेंमी

संकरित व जास्त कालावधीच्या वाणांसाठी ६० × ३० सेंमी

खत मात्रा : कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतात मिसळून द्यावे.

बाजरी पेरणी

पेरणीचे अंतर : दोन ओळींतील अंतर ३० सेंमी ठेवावे.

खत मात्रा : ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे.

भुईमूग पेरणी

पेरणीचे अंतर : ३०×१० सेंमी

खत मात्रा : प्रति हेक्टरी १० टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रेसोबत जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टर द्यावे. त्यातील अर्धे म्हणजे २०० किलो प्रति हेक्टर पेरणीवेळी तर उर्वरित २०० किलो प्रति हेक्टर आऱ्या सुटताना जमिनीत मिसळून द्यावे.

०२४२६ - २४३२३९

ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT