DAP Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

DAP Shortage : डीएपी खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता

Fertilizer Shortage : पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच डीएपी या खताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.

Team Agrowon

Buldana News : संपूर्ण चिखली तालुक्यात खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या युद्धपातळीवर तयारीला लागला आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच डीएपी या खताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.

शेतकरी खत व बियाण्याची खरेदी करीत आहेत. दुसरीकडे मशागतीला वेग आलेला असून नांगरणी, वखरणी, रोटावेटर, अशी कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. या काळात बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध खते व बियाण्यांचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

खरीप हंगामात अत्यंत उपयुक्त व पेरणीसाठी आवश्यक असलेले डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत सध्या अनेक बाजारपेठांतून गायब असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ते काळ्या बाजारात अधिक दराने विकले जात असल्याचीही माहिती मिळत आहे.

नियमित दरात उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत असून विक्रेत्यांकडे विचारणा करून देखील समाधानकारक उत्तर मिळत नाही. शासनाने वेळेत या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डीएपी खताचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

खत उपलब्ध न झाल्यास नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नकली बियाण्यांपासून संरक्षण, महागडी औषधे आणि वाढती डिझेल किंमत या समस्या देखील शेतकऱ्यांपुढे उभ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT