E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : खरीप ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून

Kharif Season : राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो. यापैकी यंदा १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी १२३ लाख हेक्टरच्या (८७ टक्के) पुढे पेरा पूर्ण केला आहे.

गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत पेरा ८१ टक्के झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरिपात पेरण्यांची गती चांगली आहे. पेरण्यानंतरची विविध पिकांच्या रोप उगवणीबाबत किंवा वाढीच्या अवस्थांविषयी कोणत्याही तालुक्यातून अद्याप तक्रार आलेली नाही. राज्यात पाऊसदेखील चांगला झालेला आहे.

एक जून ते १५ जुलै दरम्यान राज्यात सरासरी ३६७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. परंतु, यंदा याच कालावधीत ४१० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १११ टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाताची पुनर्लागवड वगळता इतर बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत.

ई-पीकपाहणीची जबाबदारी भूमि अभिलेख आयुक्तालयाकडे आहे. त्याविषयीच्या नियोजनाचा आढावा अलीकडेच आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह तसेच ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूने घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकरीस्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर ४५ दिवस चालू राहील.

१५ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी समाप्त होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ न मिळाल्यास लगेच १६ सप्टेंबरपासून तलाठी किंवा सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तलाठी आपआपल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील ३० दिवस म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवतील.

केंद्राने देशभर डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) पद्धत चालू खरिपापासून लागू केली आहे. तरीदेखील राज्य शासनानेही ई-पीकपाहणी राज्यस्तरीय पद्धत स्वतंत्रपणे राबविण्याचा निर्णय चालू ठेवला आहे. अर्थात, दोन्ही पद्धतीच्या ई-पीक पाहणीसाठी वापरले जाणारे उपयोजन (अॅप्लिकेशन) एकच ठेवण्यात आले आहे. केंद्र शासनाची ई-पीकपाहणी चालू खरिपात राज्यातील केवळ ३५ तालुक्यांपुरती मर्यादित असेल. इतर सर्व तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीनुसार ई-पीक पाहणी होणार आहे.

‘या’ तालुक्यांच्या २८५८ गावांमध्ये होणार केंद्र शासनाची ‘डीसीएस’ पीक पाहणी
तालुक्यांची नावे अशी : कंसात जिल्ह्याचे नाव

वरुड (अमरावती), पातूर (अकोला), बुलडाणा (बुलडाणा), दिग्रस (यवतमाळ), रिसोड (वाशीम), फुलंब्री (छत्रपती संभाजी महाराज), लोहारा (धाराशीव), बदनापूर (जालना), मुदखेड (नांदेड), सोनपेठ (परभणी), वडवणी (बीड), जळकोट (लातूर), औंढा नागनाथ (हिंगोली), अंबरनाथ (ठाणे), तलासरी (पालघर), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), तळा (रायगड), लांजा (रत्नागिरी), काटोल (नागपूर), देसाईगंज (गडचिरोली), आमगाव (गोंदया), सिंदेवाही (चंद्रपूर), साकोली (भंडारा), कारंजा घा.(वर्धा), देवळा (नाशिक), श्रीरामपूर (अहमदनगर), भुसावळ (जळगाव), शिंदखेडा (धुळे), तळोदा (नंदुरबार), दौंड (पुणे), गगनबावडा (कोल्हापूर), पलूस (सांगली), खंडाळा (सातारा), द.सोलापूर (सोलापूर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT